लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : श्रमिक रेल्वे गाडीमध्ये कर्तव्यावर असलेला आरपीएसएफचा जवान कोविड पॉझिटिव्ह आल्याने रेल्वे प्रशासनामध्ये खळबळ उडाली. अजनी क्वॉर्टरमध्ये हा कर्मचारी राहतो. त्याच्या कुटुंबातील सदस्यांसह, काही रेल्वे कर्मचाऱ्यांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. भगवाननगर येथील बँक कॉलनी येथेही एका रुग्णाचे कोविड निदान झाले. रेल्वे क्वॉर्टर व बँक कॉलनीत पहिल्यांदाच कोरोनाचा शिरकाव झाला. या दोन रुग्णासह नागपुरात नऊ नव्या रुग्णांची नोंंद झाली. रुग्णांची संख्या ४५५ झाली. आज पुन्हा सहा रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.श्रमिक रेल्वे गाडीमधूनच संबंधित जवानाला लागण झाली असावी, अशी शंका व्यक्त केली जात आहे. २८ वर्षीय जवानाला लक्षणे दिसून आल्याने दोन दिवसापूर्वी मेयो रुग्णालयात संशयित म्हणून भरती झाला. आज त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. या जवानासोबत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना रेल्वे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. १६ वर लोकांना क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती आहे. ओंकारनगर हावरापेठ येथील रुग्णाच्या संपर्कात आलेल्या भगवाननगर बँक कॉलनी येथील ५९ वर्षीय व्यक्तीचा नमुना एम्सच्या प्रयोगशाळेत पॉझिटिव्ह आला. या रुग्णाला एम्समध्ये भरती करण्यात आले. एम्समध्ये आता आठ पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. सांगण्यात येते की, या रुग्णाची प्रकृती गंभीर आहे. रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.सिरसपेठ, टिपू सुलतान चौक व मोमीनपुरातील रुग्ण पॉझिटिव्हमेयोच्या प्रयोगशाळेत तपासण्या आलेल्या नमुन्यामध्ये सिरसपेठ वसाहतीतील एक, टिपू सुलतान चौक परिसरातील दोन तर मोमीनपुरा वसाहतीतील चार रुग्ण पॉझिटिव्ह आले. हे सर्व रुग्ण पाचपावली पोलीस क्वॉर्टर येथे क्वारंटाईन होते. यात २१, २४, २७, ६०, ६४ वर्षीय पुरुष ४८, ५० वर्षीय महिलेचा समावेश आहे.सहा रुग्णांना डिस्चार्जमेयोमधून आज सहा रुग्णांना रुग्णालयातून सुटी (डिस्चार्ज) देण्यात आली. यात गोळीबार चौक येथील एक लहान मुलगा, दोन महिला व एक पुरुष आहे. टिमकी येथील एक पुरुष तर मोमीनपुरा येथील एका महिलेचा समावेश आहे. आतापर्यंत बरे होऊन घरी परतलेल्यांची संख्या ३६२ झाली आहे.कोरोनाची आजची स्थितीदैनिक संशयित २४६दैनिक तपासणी नमुने ११२दैनिक निगेटिव्ह नमुने ११३नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने ४५५नागपुरातील मृत्यू ०९डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण ३६२डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण २५७०क्वारंटाईन कक्षात एकूण संशयित १७९६पीडित-४५५-दुरुस्त-३६२-मृत्यू-९
CoronaVirus in Nagpur : नागपुरात आरपीएसएफच्या जवानासह नऊ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 11:58 PM
श्रमिक रेल्वे गाडीमध्ये कर्तव्यावर असलेला आरपीएसएफचा जवान कोविड पॉझिटिव्ह आल्याने रेल्वे प्रशासनामध्ये खळबळ उडाली. अजनी क्वॉर्टरमध्ये हा कर्मचारी राहतो. त्याच्या कुटुंबातील सदस्यांसह, काही रेल्वे कर्मचाऱ्यांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. भगवाननगर येथील बँक कॉलनी येथेही एका रुग्णाचे कोविड निदान झाले. रेल्वे क्वॉर्टर व बँक कॉलनीत पहिल्यांदाच कोरोनाचा शिरकाव झाला. या दोन रुग्णासह नागपुरात नऊ नव्या रुग्णांची नोंंद झाली. रुग्णांची संख्या ४५५ झाली.
ठळक मुद्देरुग्णांची संख्या ४५५ : अजनी रेल्वे क्वॉर्टर, बँक कॉलनीमध्ये कोरोनाचा शिरकाव