लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : माता आणि मोबाईल या दोन गोष्टी आज विवाहित मुलींच्या संसाराला धोक्यात टाकत आहेत. अनेक मुलींचे संसार उद्ध्वस्त होण्यास तर ९० टक्के माताच कारणीभूत आहेत. त्या आपल्या मुलींना संयम न शिकवता उलट सासरच्यांविरुद्ध भडकवत असतात. समाजाच्या सुदृढ आयुष्यासाठी हे चित्र बदलले पाहिजे. म्हणूनच मराठा सेवा संघ संयुक्त कुटुंब पद्धतीचा पुरस्कार करीत आला आहे, असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी केले. मराठा सेवा संघाचे महासचिव मधुकर मेहकरे यांच्या एकसष्ठीनिमित्त त्रिमूर्तीनगरातील मराठा सेवा संघाच्या लॉनमध्ये शनिवारी आयोजित बळीराजा संशोधन केंद्राचे लोकार्पण व संयुक्त कुटुंबांच्या सत्कार सोहळ्यात ते अध्यक्षपदावरून बोलत होते. कार्यक्रमाच्या उद्घाटक महापौर नंदा जिचकार तर प्रमुख अतिथी म्हणून आ. परिणय फुके, माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख, माजी आमदार रेखा खेडेकर, माजी मंत्री विनोद गुडधे पाटील, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष कामाजी पवार, जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा पाटील, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे मंचावर उपस्थित होते. या कार्यक्रमात महापौर नंदा जिचकार, आ. परिणय फुके, हर्षवर्धन देशमुख, दिलीप इंगोले, कमलाताई देशमुख, काशीराव जिचकार, सुषमा दिलीप उल्हे, रमेश शिरभाते, अशोक बहातकर यांचा सहकुटुंब सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक सोमनाथ लडके यांनी केले.मनपा देणार महिलांना व्यावसायिक आधारनागपुरातील स्वावलंबी महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आई जिजाऊंच्या प्रेरणेतून व मनपाच्या पुढाकारातून लवकरच एक समर्थ पर्याय आम्ही देणार आहोत. त्या पर्यायावर बरेच काम पूर्ण झाले असून, मनपाच्या येत्या बैठकीत त्याबाबतचा प्रस्ताव आणला जाईल, अशी माहिती महापौर नंदा जिचकार यांनी या कार्यक्रमात दिली.समाजहितासाठी सहकार्य करामराठा सेवा संघाच्या माध्यमातून तब्बल १२ वर्षे संघर्ष करून आम्ही ही देखणी इमारत उभी केली आहे. पण, तिच्या केवळ लोकार्पणाला मी लोकांना बोलावले असते तर ते आले नसते. म्हणून मी माझ्या एकसष्ठीचा कार्यक्रम घडवून आणला. ही इमारत लोकांच्या निधीतून उभी राहिली आहे. तिचा समाजाच्या हितासाठी उपयोग व्हावा, अशी आमची अपेक्षा आहे. त्यासाठी मदतीचे आणखी हात पुढे आले पाहिजे, असे आवाहन मधुकर मेहकरे यांनी सत्काराला उत्तर देताना केले.
९० टक्के माताच मुलींचे संसार उद्ध्वस्त करतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2017 1:03 AM
माता आणि मोबाईल या दोन गोष्टी आज विवाहित मुलींच्या संसाराला धोक्यात टाकत आहेत. अनेक मुलींचे संसार उद्ध्वस्त होण्यास तर ९० टक्के माताच कारणीभूत आहेत.
ठळक मुद्देपुरुषोत्तम खेडेकर : बळीराजा संशोधन केंद्राचे लोकार्पण