आॅनलाईन लोकमतनागपूर : राज्यातील महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्यातील सर्वच जिल्ह्यात निर्भया पथकाची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत केली.राज्यातील महिलांवर होणारे अत्याचार आणि सुरक्षेच्या मुद्यावर डॉ.नीलम गोऱ्हे , विद्या चव्हाण, हुस्नबानू खलिफे, स्मिता वाघ यांनी अल्पकालीन चर्चेची मागणी केली होती. या चर्चेला उत्तर देताना केसरकर यांनी ही घोषणा केली.राज्यातील पोलिसांमध्ये संवेदनशीलता वाढविण्याची आवश्यकता आहे. बलात्कार करणाऱ्यांवर वचक बसावा यासाठी मध्य प्रदेश, राजस्थानप्रमाणे महाराष्ट्रातदेखील कायद्यात बदल करण्याची गरज असून असे कृत्यकरणाऱ्यांना फाशी देण्याची तरतूद करावी, अशी मागणी डॉ.गोऱ्हे यांनी केली. महिला महाविद्यालयात निर्भया पथकाची देखरेख असावी, असा मुद्दा खलिफे व स्मिता वाघ यांनी मांडला. बाल व महिला गुन्ह्यांचा तपास योग्य पद्धतीने व्हावा यासाठी अगोदर सात जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर पथक सुरू करण्यात आले होते. आता सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये निर्भया पथकाची स्थापना करण्यात येईल. प्रत्येक पथकामध्ये एक पोलीस अधीक्षक, चार अधिकारी, दोन हवालदार, दोन नाईक, आठ पोलीस शिपाई यांचा समावेश राहील. केवळ बालक आणि महिलांच्या गुन्ह्यांचा तपास हे पथक करेल. हे पथक आपला अहवाल थेट पोलीस महासंचालकांना सादर करेल. तसेच निर्भया पथकाची सर्वसामान्यांना माहिती व्हावी यासाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वयंसेवी संस्थांना सोबत घेऊन जागृती करण्यात येईल, असे केसरकर यांनी स्पष्ट केले.ठाण्यात आणखी रेल्वे गार्डची आवश्यकतामुंबईत लोकलमधील महिलांच्या डब्यात सुरक्षेसाठी एक ‘गार्ड’ असतो. मात्र ठाण्यात झालेल्या काही घटनांनंतर ‘गार्ड’ची कमतरता समोर आली आहे. महिलांच्या डब्यांमध्ये नेमण्यासाठी ८५० ‘गार्ड’ची मागणी रेल्वे मंडळाकडे केली आहे, अशी माहिती केसरकर यांनी यावेळी दिली. गर्दी नसतानादेखील महिलांचा डबा सर्वसाधारण करण्यात येणार नाही, असे आश्वासनदेखील त्यांनी दिले.
राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये निर्भया पथक स्थापन करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 6:49 PM
राज्यातील महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्यातील सर्वच जिल्ह्यात निर्भया पथकाची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत केली.
ठळक मुद्देगृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांची घोषणा