- जिनिंग, स्पिनिंगनंतर गारमेंट क्षेत्रातही पदार्पण
नागपूरपासून ४५ किमी अंतरावर अमरावती रोडवर बाजारगावच्या पुढे सुमारे ५० एकरात निर्मल टेक्सटाइल्स प्रकल्प साकारण्यात आला आहे. जिनिंग, स्पिनिंगपासून सुरूवात केल्यानंतर आता गारमेंट क्षेत्रातही यशस्वी पदार्पण केले आहे. संस्थेचे संस्थापक सचिव प्रमोद मानमोडे यांनी अंगीकारलेल्या सकारात्मक व विकासाभिमुख दृष्टिकोनातून निर्मल टेक्सटाईल्सची वीण अणखी घट्ट होत आहे. संस्थेच्या या प्रकल्पाने केलेली यशस्वी वाटचाल ही केवळ नागपूर, विदर्भासाठी नव्हे, तर राज्यासाठी प्रेरणादायी आहे.
निर्मल जिनिंग व प्रेसिंग
- निर्मल टेक्सटाईल्स अंतर्गत निर्मल जिनिंग व प्रेसिंग हे स्वतंत्र युनिट उभारण्यात आले आहेत. जिनिंगमध्ये शेतकऱ्यांकडून थेट कापूस खरेदी केला जातो. कापूस विक्रीसाठी येणाऱ्या शेतकऱ्याला कुठलाही त्रास होऊ नये, याची विशेष काळजी घेतली जाते. येथे लागलेल्या अद्ययावत मशीनद्वारे कापसापासून गाठी तयार केल्या जातात. यासाठी तब्बल ३० डीआर मशीन लागल्या आहेत. एका तासात १६० किलोची एक याप्रमाणे १४ गाठी तयार करण्याची क्षमता आहे. या गाठी साठविण्यासाठी सुसज्ज असे गोदाम उभारण्यात आले आहे. नोव्हेंबर ते मार्च महिन्यात येथे कापसाची आवक जास्त असते. त्यामुळे दोन शिफ्टमध्ये काम चालते. प्रशिक्षित कर्मचारी वर्ग याची धुरा सांभाळत आहे.
स्पिनिंग युनिट
- निर्मल टेक्सटाईल्सचे स्पिनिंग युनिट पाहून डोळे थक्क होतात. अद्ययावत तंत्रज्ञान, फुल मेकॅनाइज्ड व्यवस्था, कमालीची स्वच्छता, प्रशिक्षित कर्मचारी व कामगार व एकूणच व्यवस्थापन वाखाणण्याजोगे आहे. जिनिंग व प्रेसिंग युनिटमध्ये तयार करण्यात आलेल्या कापसाच्या गाठी पुढे प्रक्रिया करून धागा तयार करण्यासाठी स्पिनिंग युनिटमध्ये आणल्या जातात. पहिल्या टप्प्यात फायबर टू फायबर सेपरेशन केले जाते. यासाठी १९ कार्ड लागले आहेत. येथे एका तासात ११०० किलो स्लीवर तयार होते.
- ड्रॉईंग युनिटमध्ये कोम्ब व कार्डेड वेगवेगळे होतात. सिम्प्लेक्स युनिटमध्ये रोविंग (मोठा धागा) तयार होतो. येथे एका दिवसात १८ मशीनवर २१ टन धागा तयार होतो.
- नंतर लिंग कोनर या जपानी मशीनद्वारे या धाग्याचे बंडल तयार केले जातात. गुणवत्तेसाठी या बंडलची अल्ट्राव्हायोलेट चेकिंग होते.
- टीएफओ (टू फॉर वन) युनिटमध्ये दोन धाग्यांपासून एक धागा तयार होतो. ६ अद्ययावत मशीन आहेत. २४ तासात ४ टन उत्पादनाची क्षमता आहे.
- वायसीजी (यान कंडिशनिंग प्लांट) मध्ये धाग्याचे बंडल ह्युमिडिटी मेंटेन करण्यासाठी लावले जातात. एका तासाच्या प्रोसेसमध्ये एकावेळी सात ट्रॉली लागतात.
- सर्व प्रक्रिया होऊन तयार झालेले बंडल पॅक करण्यासाठी पॅकेजिंग डिपार्टमेंटमध्ये आणले जातात. येथे त्यांची मागणीनुसार व पाठविण्याच्या ठिकाणानुसार पॅकिंग करून डिस्पॅच केले जाते.
जागतिक बाजारपेठेत मागणी वाढतेय
- निर्मल टेक्सटाईल्समध्ये तयार होणार धागा राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय स्तरावर पाठविला जात आहे. विशेष म्हणजे, गुणवत्तेमुळे या धाग्याला जागतिक बाजारपेठेतही मागणी वाढत आहे. देशांतर्गत अहमदाबाद, मालेगाव, भिवंडी, कोलकाता, इचलकरंजी, दिल्ली येथे पाठविला जातो. मर्चंट एक्स्पोर्टद्वारे टर्की, बांग्लादेश, इजिप्त, व्हीएतनाम, श्रीलंका यासारख्या देशांमध्येही पाठविला जात आहेत.
क्वालिटी कंट्रोल लॅब
- निर्मल टेक्सटाईल्समध्ये अद्ययावत क्वालिटी कंट्रोल लॅब उभारण्यात आली आहे. येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मापदंड पाळून गुणवत्ता तपासणी केली जाते. कोणत्याही परिस्थितीत धाग्याची गुणवत्ता कमी होऊ नये याची विशेष काळजी घेतली जाते. आंतरराष्ट्रीय पातळीवर होणारे बदल व सुधारणा त्वरित अमलात आणल्या जातात. त्यामुळे येथे तयार होणाºया धाग्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे.
शेतकऱ्यांच्या कापसाचा चांगला भाव मिळावा व शेतकऱ्यांच्या मुलांना रोजगार मिळावा, यासाठी निर्मल टेक्सटाइल्सतर्फे विदर्भात तीन जिनिंग व अत्याधुनिक स्पिनिंग उभारण्यात आले आहे. विदर्भाच्या भूमित समृद्धता आणणे हेच आपले ध्येय आहे.
- प्रमोद मानमोडे
संस्थापक सचिव, निर्मल टेक्सटाईल्स