लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : औष्णिक वीज केंद्रातून किंवा इतर पारंपरिक माध्यमातून निर्मित विजेमुळे पर्यावरणाचा ºहास होतो. याचा विचार करता नागपूर सुधार प्रन्यासच्या निर्माणाधीन प्रत्येक प्रकल्पाच्या ठिकाणी सौर ऊर्जेचे सोलर पॉवर प्लांट आपल्याला बघायला मिळत आहे. याचाच एक भाग म्हणून नासुप्रच्या मुख्य कार्यालयाच्या छतावर लावण्यात आलेल्या सोलर पावर प्लांटच्या माध्यमातून वर्षभरात २४ लाखांची वीज बचत करण्यात आलीनासुप्रने वर्षभरापूर्वी ६० किलोवॅट क्षमतेचे सोलर पॉवर प्लांट उभारले आहे. नासुप्रला हे सोलर प्लांट उभारण्यास ३६.६० लक्ष इतका खर्च आला असून, या ठिकाणी एकूण १९४ सोलर पॅनेल बसविण्यात आले आहेत. व यानंतर टप्प्याटप्प्याने नासुप्र विभागीय कार्यालय, नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण विभागीय कार्यालय व नासुप्र उद्यान यामध्ये कार्यान्वित केले जाणार असल्याचे नासुप्र सभापती अश्विन मुदगल यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करताना सांगितले. तसेच पर्यावरण संरक्षणाचे ध्येय ठेवून ही उपाययोजना करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
सौर ऊर्जेतून नासुप्रची २४ लाखांची बचत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2018 1:38 AM
औष्णिक वीज केंद्रातून किंवा इतर पारंपरिक माध्यमातून निर्मित विजेमुळे पर्यावरणाचा ºहास होतो. याचा विचार करता नागपूर सुधार प्रन्यासच्या निर्माणाधीन प्रत्येक प्रकल्पाच्या ठिकाणी सौर ऊर्जेचे सोलर पॉवर प्लांट आपल्याला बघायला मिळत आहे. याचाच एक भाग म्हणून नासुप्रच्या मुख्य कार्यालयाच्या छतावर लावण्यात आलेल्या सोलर पावर प्लांटच्या माध्यमातून वर्षभरात २४ लाखांची वीज बचत करण्यात आली
ठळक मुद्देनासुप्र मुख्य कार्यालय बनले पर्यावरणपूरक