शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंचीही पंकजा मुंडेंना साथ; दसरा मेळाव्याला हजर राहण्याची घोषणा करत म्हणाले...
2
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
3
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
4
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!
5
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
6
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
7
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
8
१२० मिनिटांचा थरार, समोर होता मृत्यू, पण वैमानिकानं दाखवलं प्रसंगावधान, असं उतरवलं विमान 
9
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
10
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
11
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
12
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
13
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
14
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
15
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
16
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
17
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
18
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
19
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
20
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी

Nitin Deshmukh: ‘माझ्याशी दहशतवाद्याप्रमाणे वर्तन’, नितीन देशमुख यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 7:52 AM

Nitin Deshmukh: एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरतला गेलेले बाळापूरचे शिवसेना आमदार नितीन देशमुख यांनी बुधवारी घरवापसी केली. नागपूरला पोहोचल्यानंतर त्यांनी गुजरातमध्ये स्थानिक पोलिसांनी त्यांच्याशी दहशतवादी असल्याप्रमाणेच वर्तणूक केल्याचा आरोप केला.

- योगेश पांडे  नागपूर : एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरतला गेलेले बाळापूरचे शिवसेना आमदार नितीन देशमुख यांनी बुधवारी घरवापसी केली. नागपूरला पोहोचल्यानंतर त्यांनी गुजरातमध्ये स्थानिक पोलिसांनी त्यांच्याशी दहशतवादी असल्याप्रमाणेच वर्तणूक केल्याचा आरोप केला. एकनाथ शिंदे यांनी विश्वासात न घेता सुरतला नेले होते. मी नेहमी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतच असेन, असे त्यांनी स्पष्ट केले.   शिंदेंच्या सांगण्यानुसार त्यांच्या गाडीत बसलो. मात्र, सुरतला गेल्यावर तेथून निघण्याचा प्रयत्न केला; परंतु गुजरात पोलिसांनी माझ्यावर पहारा ठेवला. मी हॉटेलमधून पलायन केले. पहाटे ३ वाजता दीडशे पोलीस मागे लागले होते. मी वरिष्ठ नेत्यांशी संपर्कात होतो. मात्र, फोनची बॅटरी डाऊन झाली व त्यात पाऊसदेखील होता. त्यामुळे व्हॉटस्ॲप लोकेशन शेअर करता आले नाही. मला पोलिसांनी उचलून रुग्णालयात नेले. २०-२५ जणांनी मला पकडले व इंजेक्शन टोचले. त्यानंतर मला झोप लागली. मला हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले गेले. मात्र ते खोटे होते. 

शिंदेंकडून अनेक आमदारांचा विश्वासघात- कुठलीही पूर्वकल्पना न देता एकनाथ शिंदे यांनी आम्हाला सुरत व तेथून गुवाहाटीला नेले. माझ्याप्रमाणेच इतरही काही आमदारांची मनःस्थिती आहे. मात्र, ते तेथून निघू शकले नाहीत. - मी शिवसैनिक, उद्धव ठाकरे व अरविंद सावंत यांच्यामुळे आमदार झालो असून, माझ्यासाठी तेच महत्त्वाचे आहेत. मी नेहमी उद्धव ठाकरेंसोबतच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Nitin Deshmukhनितीन देशमुखShiv Senaशिवसेना