शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
3
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
4
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
5
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
6
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
7
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
8
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
10
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
11
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
12
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
14
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
15
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
16
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
17
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
18
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
19
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
20
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे

नितीन गडकरी सलग दुसऱ्यांदा केंद्रीय मंत्री : विदर्भाच्या विकासाला मिळणार नवा ‘बूस्टर डोज’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 8:44 PM

देशाच्या राजकारणात एक कर्तृत्ववान नेते व ‘व्हिजन’ असलेले राजकारणी अशी ओळख असलेले नितीन गडकरी यांनी सलग दुसऱ्यांदा केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली. २०१४ पासून भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी, जलसंपदा व गंगा पुनरुत्थान मंत्रालयाची जबाबदारी सांभाळत असताना त्यांनी आपल्या कार्यशैलीने विरोधकांनादेखील प्रभावित केले होते. नवीन जबाबदारी सांभाळत असताना देशासह विदर्भाच्या विकासाला नवा ‘बूस्टर डोज’ मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

ठळक मुद्देधडाकेबाज कामाची कार्यशैली कायम राहणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशाच्या राजकारणात एक कर्तृत्ववान नेते व ‘व्हिजन’ असलेले राजकारणी अशी ओळख असलेले नितीन गडकरी यांनी सलग दुसऱ्यांदा केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली. २०१४ पासून भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी, जलसंपदा व गंगा पुनरुत्थान मंत्रालयाची जबाबदारी सांभाळत असताना त्यांनी आपल्या कार्यशैलीने विरोधकांनादेखील प्रभावित केले होते. नवीन जबाबदारी सांभाळत असताना देशासह विदर्भाच्या विकासाला नवा ‘बूस्टर डोज’ मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. 

२०१४ साली मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतरच नितीन गडकरी यांनी देशभरात कामाचा धडाका लावला होता. त्यांच्या कार्यकाळात राष्ट्रीय महामार्गांचे रुप पालटले व देशात लाखो किलोमीटर लांबीच्या महामार्गांच्या कामाला सुरुवात झाली. विशेष म्हणजे ईशान्येकडील राज्यांमधील महामार्गांचे जाळे विस्तारले. दुसरीकडे गडकरी यांच्या प्रयत्नांतून देशातील जलवाहतुकीलादेखील नवीन संजीवनी मिळाली. अनेक वर्षे अडगळीत पडलेला वाराणसी ते हल्दिया हा १३९० किलोमीटर लांबीचा जलमार्ग प्रकल्प गडकरी यांच्या प्रयत्नांमुळे प्रत्यक्षात उतरला. शिवाय वाराणसी येथे मल्टीमॉडेल हब स्थापन करुन एक इतिहासच रचला. गंगा नदीच्या स्वच्छतेलादेखील गती आली आहे आणि नदीकाठच्या काही मोठ्या शहरातील सांडपाण्यावर प्रक्रियेचे प्रकल्पदेखील कार्यान्वित झाले आहेत. गडकरी यांची कार्यशैली लक्षात घेता नवीन जबाबदाऱ्यादेखील ते त्याच तत्परतेने सांभाळतील व देशातील पायाभूत सुविधांच्या विकासाला वेग येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.महाराष्ट्र-विदर्भाला मोठ्या आशादिल्लीत काम करत असताना गडकरी यांनी महाराष्ट्र व विदर्भाकडे नेहमीच लक्ष ठेवले. यांच्या पुढाकारातून राज्यात प्रत्यक्षात हजारो किलोमीटर लांबीच्या महामार्गांचे काम झाले आहे. याशिवाय ६५ मार्गांवर हजारो कोटींची कामे सुरूदेखील आहेत. १४ महामार्गांचे चौपदरीकरण अंतिम टप्प्यात आले आहे.नागपूर घेणार ‘ग्लोबल’ झेपगडकरी प्रतिनिधित्व करीत असलेल्या नागपूरचा मागील पाच वर्षांत कायापालट झाला. ‘मेट्रो’ सुरू झाली. शिवाय ‘आयआयएम’, ‘एम्स’ यासारख्या राष्ट्रीय पातळीवर शैक्षणिक संस्थादेखील सुरू झाल्या. मोठ्या आयटी कंपन्यांचेदेखील काम सुरू झाले असून पुढील पाच वर्षात शहरात गुंतवणुकीचा ओघ वाढून नागपूर ‘ग्लोबल’ झेप घेणार हे खुद्द गडकरी यांनीच सांगितले आहे.स्वयंसेवक ते केंद्रीय मंत्रीराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत वाढलेले गडकरी यांनी महाविद्यालयीन जीवनात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते म्हणून काम केले. १९८९ मध्ये नागपूर पदवीधर विधानसभा मतदार संघातून त्यांना भाजपाने उमेदवारी दिली. सातत्याने १९८९, १९९६, २००२ मध्ये त्यांनी निवडणुका जिंकल्या. १९९५ साली राज्यात युतीचे शासन आल्यानंतर त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचा पदभार सोपविण्यात आला होता आणि त्यांनी मुंबईसह राज्यात १०० हून अधिक उड्डाण पुलांची मालिकाच उभारली. विकासपुरुष, ‘रोडकरी’, ‘पुलकरी’, ही बिरुदे त्यांना या काळात चिकटली. २००९ साली गडकरी यांचे नाव राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी जाहीर करण्यात आले. गडकरी यांनी पक्षाला नवी ऊर्जा दिली व ‘व्हिजन-२०२५’मुळे पक्षात नवा जोश संचारला. ‘मूठभर लोकांचा संकुचित आणि मर्यादित पक्ष’ ही भाजपाची प्रतिमा त्यांनी बदलली. २०१४ साली भाजपाचे सरकार सत्तेत आले व केंद्रात त्यांच्याकडे भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी मंत्रालयाची जबाबदारी सोपविण्यात आलीस्वयंसेवक ते केंद्रीय मंत्रीराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत वाढलेले गडकरी यांनी महाविद्यालयीन जीवनात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते म्हणून काम केले. १९८९ मध्ये नागपूर पदवीधर विधानसभा मतदार संघातून त्यांना भाजपाने उमेदवारी दिली. सातत्याने १९८९, १९९६, २००२ मध्ये त्यांनी निवडणुका जिंकल्या. १९९५ साली राज्यात युतीचे शासन आल्यानंतर त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचा पदभार सोपविण्यात आला होता आणि त्यांनी मुंबईसह राज्यात १०० हून अधिक उड्डाण पुलांची मालिकाच उभारली. विकासपुरुष, ‘रोडकरी’, ‘पुलकरी’, ही बिरुदे त्यांना या काळात चिकटली. २००९ साली गडकरी यांचे नाव राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी जाहीर करण्यात आले. गडकरी यांनी पक्षाला नवी ऊर्जा दिली व ‘व्हिजन-२०२५’मुळे पक्षात नवा जोश संचारला. ‘मूठभर लोकांचा संकुचित आणि मर्यादित पक्ष’ ही भाजपाची प्रतिमा त्यांनी बदलली. २०१४ साली भाजपाचे सरकार सत्तेत आले व केंद्रात त्यांच्याकडे भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी मंत्रालयाची जबाबदारी सोपविण्यात आली.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीministerमंत्रीCentral Governmentकेंद्र सरकार