Nitin Gadkari ( Marathi News ) : काल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर येथील एका कार्यक्रमात वनखात्याच्या अधिकाऱ्यांना धमकावल्याचा एक किस्सा सांगितला.गडकरी काल एका कार्यक्रमात बोलत होते, यावेळी त्यांनी सरकारमध्ये काम करत असताना आलेले अनुभव सांगितले.यावेळी गडकरी यांनी भाजप-शिवसेना युतीच्या सरकार काळातील एक किस्सा सांगितला.
नागपूर येथील कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी म्हणाले, राज्यात भाजपा-शिवसेना युतीचे सरकार होते. त्यावेळी मुख्यमंत्री मनोहर जोशी होते आणि राज्यपाल अलेक्झांडर होते. त्यावेळी मी राजदूत गाडीवरुन मेळघाटातील गावांमध्ये फिरत होतो. तिथल्या रस्त्यांची अवस्था खराब होती. तरीही वनखात्याचे अधिकारी रस्त्याचे काम करु देत नव्हते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सुनावले होते.
४१००० मृत्यू, मोठा विध्वंस, तरीही हमासचे सैन्य मागे हटलेले नाही; १०१ इस्रायली अजूनही ओलीस
"त्यावेळी मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं की हा विषय माझ्यावर सोडा. मी बघतो काय करायचे . त्यावेळी मी वनखात्याच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की, मी तरुणपणी नक्षलवादी चळवळीत होतो, मी चुकून राजकारणात आलो. पण आता पुन्हा चळवळीत आलो गेलो तर तुम्हाला गोळ्यांनी फुंकल्याशिवाय राहणार नाही, त्यानंतर मी अधिकाऱ्यांसोबत जे केल आहे, ते इकडे सांगू शकणार नाही. यानंतर मेळघाटातील सगळे रस्ते पूर्ण झाले, असंही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.
गडकरी म्हणाले, मला एका पत्रकाराने विचारले की सरकारमध्ये काय चांगले आणि काय वाईट आहे? मी त्यांना एका वाक्यात सांगितले की, चांगल्या माणसाला सन्मान नाही आणि वाईट माणसाला शिक्षा नाही त्याच नाव सरकार. कारण एखाद्याला शिक्षा करायची म्हटलं की ती पद्धत पूर्ण उलट आहे. एखाद्याने फाईल दाबून ठेवली की ती वरतीच येत नाही, असंही नितीन गडकरी यांनी सांगितले.