शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

नितीन गडकरी यांनी घेतली देवेंद्रसागरजी महाराज यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 12:31 AM

केंद्रीय भूपृष्ट परिवहन, जहाजराणी व जलसंसाधनमंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच आचार्यश्री देवेंद्रसागरजी महाराज यांची भेट घेतली. यावेळी आचार्यश्री यांच्याशी विविध राष्ट्रीय मुद्यांवर गडकरी यांनी चर्चा केली. सकल जैन समाजाच्यावतीने श्री संभवनाथ श्वेतांबर जैन मंदिर, वर्धमाननगर येथे या विशेष चर्चा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी सकल जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय दर्डा, उद्योजक मनीष मेहता आणि वर्धमाननगर जैन संघाचे अध्यक्ष गणेश जैन प्रामुख्याने उपस्थित होते.

ठळक मुद्देविविध राष्ट्रीय मुद्यांवर केली चर्चा : सकल जैन समाजाचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्रीय भूपृष्ट परिवहन, जहाजराणी व जलसंसाधनमंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच आचार्यश्री देवेंद्रसागरजी महाराज यांची भेट घेतली. यावेळी आचार्यश्री यांच्याशी विविध राष्ट्रीय मुद्यांवर गडकरी यांनी चर्चा केली. सकल जैन समाजाच्यावतीने श्री संभवनाथ श्वेतांबर जैन मंदिर, वर्धमाननगर येथे या विशेष चर्चा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी सकल जैन समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय दर्डा, उद्योजक मनीष मेहता आणि वर्धमाननगर जैन संघाचे अध्यक्ष गणेश जैन प्रामुख्याने उपस्थित होते.आचार्यश्री यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना राष्ट्रहिताच्या दृष्टीने पर्यावरण, औषध, कृषिविकास आणि समस्यांच्या निराकरणाकडे लक्ष वेधले. आचार्यश्री यांनी सांगितले, त्यांच्या मार्गदर्शनात वैज्ञानिकांनी इंधनासोबत मिश्रण करता येणाऱ्या नैसर्गिक फ्युएल सप्लीमेंटची निर्मिती केली असून त्यास १३९ देशांकडून मान्यता मिळाली आहे. एक लिटर पेट्रोल किंवा डिझेलमध्ये केवळ ५ मिली. सप्लीमेंट टाकल्यास वाहनातून निघणारा धूर प्रदूषणमुक्त होईल आणि वाहनाचे मायलेजही दुपटीने वाढेल. या तेलाच्या उपयोगामुळे पर्यावरण शुद्धीकरणासह इंधनाच्या आयातीत घट होईल व अर्थव्यवस्थाही मजबूत होईल. याशिवाय कमी पाण्यात या वनस्पतीचे उत्पादन घेणे शक्य असल्याने शेतकऱ्यांनाही मोठा लाभ मिळेल. वर्षभर ही शेती करणे शक्य आहे आणि यातून निघणारे वेस्ट जमिनीची सुपिकता वाढविण्यासाठी पुन्हा उपयोगात आणता येणे शक्य असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. सोबतच मोठ्या प्रमाणात होत असलेल्या मांस निर्यातीवर बंधन येईल व देशातील पशुधनही वाचेल, असे त्यांनी स्पष्ट केले. आचार्यश्री यांनी यावेळी या संपूर्ण प्रकल्पाची रुपरेखा गडकरी यांना भेट दिली. हिंसा आणि दहशतवाद अशा गंभीर समस्यांवरही त्यांनी यावेळी उपाय सुचविले.नितीन गडकरी यांनी सरकारच्या धोरणांचा उल्लेख करीत पुण्यातील प्रयोगशाळेला हा प्रकल्प स्वीकृतीसाठी आग्रह केला. मान्यता मिळाल्यानंतर सरकार लवकरच यावर निर्णय घेईल, असा विश्वास त्यांनी दिला. यावेळी मंदिराच्यावतीने नितीन गडकरी व विजय दर्डा यांचा सत्कार करण्यात आला. आचार्यश्री यांनी गडकरी यांना घंटाकर्ण महावीर यांची प्रतिकृती भेट केली.याप्रसंगी स्थानवासी श्रावक संघाचे अध्यक्ष हस्तीमल कटारिया, दिलीप राकां, वर्धमान बँकेचे संचालक अतुल कोटेचा, प्रवीण चौधरी, रमेश पारेख, भावेश मेहता, दीपक मेहता, धीरेन कोरडिया, सुभाष मेहमवाल, संजय मेहता, पारसमल ओसवाल, पारस जैन, अजय बैद, नवनीतभाई शाह, नवीन जैन, बंटी मेहता, आशीष सेठ, विनोद चोरडिया आदी उपस्थित होते.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीnagpurनागपूर