शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

नितीन गडकरींच्या संपत्तीत ५१ टक्क्यांची वाढ; पाच वर्षांत एवढे कोटी वाढले

By योगेश पांडे | Published: March 27, 2024 11:42 PM

कर्जाचा आकडादेखील वाढला : पाच वर्षांत एकाही नवीन भूखंडाची खरेदी नाही

नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदीमंत्री नितीन गडकरी यांनी निवडणूक शपथपत्रात संपत्तीचे विस्तृत विवरण दिले आहे. त्यानुसार गडकरी, त्यांच्या पत्नी कांचन यांच्या नावे मिळून एकूण १५.५२ कोटींची संपत्ती आहे. मागील पाच वर्षांत गडकरी दांपत्याच्या संपत्तीत ५१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर एकूण कर्जाची रक्कमदेखील वाढली आहे.

२०१९ साली गडकरी व त्यांच्या पत्नीकडे मिळून १० कोटी २७ लाख ३४ हजार ८५४ रुपयांची संपत्ती होती. तर २०२४ मध्ये हा आकडा १५ कोटी ५२ लाख ६० हजार ४६ इतका झाला. शपथपत्रातील माहितीनुसार गडकरी व त्यांच्या पत्नीकडे २०१९ साली १ कोटी ६१ लाख ३७ हजार ८५१ रुपयांची चल संपत्ती होती. २०२४ मध्ये हा आकडा २ कोटी ५७ लाख ७७ हजार ४६ इतका झाला आहे. यात २७ हजार ५० रुपयांची रोकड, ६५ लाख १० हजार ३०० रुपयांचे ‘बँक डिपॉझिट्स’, ३८ लाख ५० हजार ३९६ हजार रुपयांची गुंतवणूक, ४५ लाख ९४ हजार ८४३ रुपयांची वाहने तर ५६ लाख १ हजार ७५७ रुपयांच्या दागिन्यांचा समावेश आहे.

अचल संपत्ती जैसे थे, मूल्य वाढले२०१९ ते २०२४ या कालावधीत गडकरी व त्यांच्या पत्नीच्या नावे कुठलीही नवीन अचल संपत्तीची खरेदी झालेली नाही. २०१९ साली त्यांच्याकडे ८ कोटी ६५ लाख ९७ हजार रुपये मूल्याची अचल संपत्ती होती. आता त्याचे मूल्यांकन १२ कोटी ९४ लाख ८३ हजार इतके आहे. अचल संपत्तीमध्ये १ कोटी ५७ लाख ४१ हजारांची धापेवाडा येथे १५ एकर शेतजमीन, वरळी येथील ४ कोटी ९५ लाख चालू बाजारमूल्य असलेला फ्लॅट, धापेवाडा येथील १ कोटी २८ लाख ३२ हजारांचे वडिलोपार्जित घर, उपाध्ये मार्ग येथील ५ कोटी १४ लाखांचे घर यांचा समावेश आहे. केवळ नितीन गडकरी यांच्या नावे १ कोटी ३२ लाख ९० हजारांची चल संपत्ती व ४ कोटी ९५ लाखांची अचल संपत्ती आहे.

वाहनांचे मूल्य घटले२०१९ साली गडकरी व त्यांच्या पत्नीकडे एकूण सहा कार होत्या व त्यांचे तत्कालिन मूल्य ४६ लाख ७६ हजार इतके होते. आता गडकरी दांपत्याकडे सहा वाहने असून त्यांचे मूल्य ४५ लाख ९४ हजार इतके आहे. २०१९ ते २०२४ या कालावधीत त्यांनी दोन कार खरेदी केल्या.

वार्षिक उत्पन्नात वाढ, कर्जाचा आकडादेखील वाढला२०१९ साली गडकरी दांपत्यावर १ कोटी ६२ लाख २९ हजार रुपयांचे कर्ज होते. पाच वर्षांत कर्जाचा आकडा वाढून २ कोटी ४ लाख ९१ हजार १४० वर पोहोचला आहे. २०१७-१८ साली गडकरी दांपत्याचे वार्षिक उत्पन्न ४५ लाख ८३ हजार रुपये होते. २०२२-२३ मध्ये त्यात १८.८४ टक्क्यांची वाढ होऊन तो आकडा ५४ लाख ४६ हजार ९० इतका झाला आहे.

दहा न्यायालयीन प्रकरणेदरम्यान, गडकरी यांच्याविरोधात विविध प्रकारचे दहा न्यायालयीन खटले सुरू आहेत.

पाच वर्षांत सात मानद पदव्यादरम्यान, गडकरी यांना २०१९ ते २०२४ या पाच वर्षांच्या कालावधीत सात मानद पदव्या प्रदान करण्यात आल्या. यात चार डी.लिट, एक पीएचडी व दोन डीएस्सी पदव्यांचा समावेश आहे. त्यांच्या कार्यासाठी या पदव्या त्यांना देण्यात आल्या. गडकरी यांचे शिक्षण बीकॉम व एलएलबी झाले आहे.

वर्षनिहाय संपत्तीसंपत्ती : २०१९ : २०२४चल संपत्ती : १,६१,३७,८५१ : २,५७,७७,०४६अचल संपत्ती : ८,६५,९७,००० : १२,९४,८३,०००कर्ज : १,६२,२९,०५५ : २,०४,९१, १४०

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीnagpurनागपूरElectionनिवडणूकlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपा