नागपूर : भारत जोडो यात्रेत हैदराबाद येथे सहभागी झाले असताना माजी मंत्री नितीन राऊत यांना कुणाचा तरी धक्का लागला व तोल जाऊन ते खाली पडले. यामुळे त्यांचा डावा डोळा जखमी झाला असून, त्यांना उपचारासाठी हैदराबाद येथील इस्पितळात दाखल करण्यात आले.
राहुल गांधी यांच्यासोबत यात्रेत चालत असताना कार्यकर्ते व नागरिकांची मोठी गर्दी होती. या गर्दीतून मार्ग काढत प्रत्येक जण पुढे जाण्याचा प्रयत्न करीत होते. अशाच प्रयत्नात कुणाचा तरी राऊत यांना धक्का लागला.