लोकमत न्युज नेटवर्कनागपूर : शहरात सर्वत्र डेंग्यूचा प्रकोप सुरु आहे. महापालिकेतील पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या मुलांनाही डेंग्यूची लागण झाली आहे. नगरसेवकही दहशतीत आहेत. सोमवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत याचे पडसाद उमटले. शहरातील आयआरडीपी तसेच सिमेंट रोडच्या बाजुला पाणी साचत असल्याने डेंग्यूचा प्रकोप वाढला आहे. त्यातच सभागृहातील निर्णयाची अंमलबजाणी होत नसल्याने यात भर पडली आहे. सर्वपक्षीय नगरसेवकांनी शहरातील डेंग्यूच्या प्रकोपाला महापालिका प्रशासनाला जबाबदार धरले. महापौर नंदा जिचकार यांनी आयुक्तांना स्वत: पाहणी करून डेंग्यू नियंत्रणासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.विरोधपक्षनेते तानाजी वनवे यांनी शहरातील आयआरडीपी रस्त्यालगतच्या पावसाळी नाल्या बुजल्याने त्यात पाणी साचत असल्याचा मुद्दा प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला. यावर कार्यकारी अभियंता मनोज तालेवार यांनी जुलै महिन्यात एकाच दिवशी २६५ मि.मी. पाऊ स पडल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती, अशी माहिती दिली. नाल्याची साफसफाई करण्याची जबाबदारी महापालिकेच्या आरोग्य विभागाची असून आयआरडीपी रस्त्यांच्या नाल्याची क्षमता कमी झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.तानाजी वनवे म्हणाले, नाल्या साफ करण्यासाठी आवश्यक असलेली यंत्रसामुग्री महापालिकेकडे नाही. नाले सफाईच्या फाईलला अद्याप मंजुरी देण्यात आलेली नाही. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांना अद्याप एक रुपयाची शासनाकडून मदत मिळाली नाही. बसपाचे गटनेते मोहम्मद जमाल यांनीही नाल्याची साफसफाई होत नसल्याचे निदर्शनास आणून नवीन पाईप टाकण्याची मागणी केली. काँग्रेसचे मनोज सांगोळे यांनी नाले दुरुस्तीच्या फाईल मंजूर होत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. काही पदाधिकाºयांनी सनसिटीच्या कामासाठी उत्तर नागपुरातील नाल्या बंद केल्या. दुर्बल घटकांचा निधी मंजूर आहे, पण दिला जात नाही. असा आरोप त्यांनी केला.झुल्फेकार भुट्टो यांनी मोमीनपुरा भागातील नाल्या तुंबल्याने डासांची उत्पत्ती होत असल्याचे निदर्शनास आणले. प्रणिता शहाणे यांनी प्रभाग ३८ मध्ये सिमेंट रोडमुळे पाणी तुबल्याने डेंग्यूचा प्रकोप वाढल्याचा आरोप केला. बसचा जितेंद्र घोडेस्वार म्हणाले, सभागृहात निर्णय होतात.परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही. नाले सफाई व दुरुस्तीला मंजुरी देण्यात आली. परंतु प्रशासनाने कामे केली नाही. सभागृहाच्या निर्णयानंतरही आयुक्त अधिकाºयांची समिती गठित करून फाईल अडवत असल्याचा आरोप त्यांनी केला.आयआरडीपी रस्त्यांमुळे डासांचा प्रकोप२००२ मध्ये तत्कालीन आयुक्त टी. चंद्रशेखर यांनी शहरातील आयआरडीपीचे रस्ते तयार केले. परंतु रस्त्याची कामे करताना नियोजन नसल्याने या रस्त्यालगतच्या नाल्यात पावसाचे पाणी तुबंल्याने शहरात डासांचा प्रकोप वाढल्याचा आरोप भाजपाचे नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी केला. शहरातील ज्या भागात भूमिगत नाल्या आहेत. अशा भागात डासांचा प्रादुर्भाव कमी आहे. त्यावेळी आयुक्तांनी पदाचा गैरवापर करून काम केल्याचा आरोप त्यांनी केला.हॉटेल मालक व्यावसायिकांवर कारवाईशहरातील डेंग्यूचा प्रकोप विचारात घेता आयुक्तांनी स्वत: पाहणी करावी. पावसाळी नाल्यात पाणी तुंबत असल्यास त्यावर उपायोजना कराव्यात, हॉटेल व व्यावसायिकांमुळे डासांचा नागरिकांना त्रास होत असेल तर त्यांच्यावर कारवाई करा. पावसाळी नाल्याच्या प्रलंबित फाईल तातडीने निकाली काढण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी आयुक्तांना दिले.