लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मालमत्ताकराची थकबाकी न भरल्याने महापालिकेच्या लक्ष्मीनगर झोन कार्यालयाने रामदासपेठ येथील सेंट्रल मॉवर जप्तीची नोटीस बजावली. सेंट्रल मॉलने वर्ष २०१३ पासून मालमत्ताकर न भरल्याने थकबाकी ८ कोटी ९६ लाख ३५ हजार ९४४ रुपये झाली आहे. तसेच यावर ९२.९० लाख रुपये दंड आकारण्यात आला आहे. थकबाकी व दंडाची रक्कम न भरल्यास लवकरच मॉलचा लिलाव केला जाणार आहे.कर विभागाने दिलेल्या माहितीनुसार वॉर्ड क्रमांक ७२ येथील मे.एन.कुमार प्रोजेक्ट अॅन्ड इंन्फ्रा. प्रा. लिमिटेड च्या सेंट्रल मॉल(ंमालमत्ता क्र.७३६) राष्ट्रभाषा सभा (ंमालमत्ता क्र.११३५/यू / २), डॉ. जेसवानी (घर क्रमांक २४/अ /१०३), वॉर्ड क्रमांक ७४ येथील सुभाष मोतीराम कासूलकर (घर क्रमांक ५०१/५१/अ/२०१) व वॉर्ड क्रमांक ३५ येथील सुनील श्रीराम मानखीकर (घर क्रमांक ९९४) येथे जप्ती नोटीस लावण्यात आलेली आहे. कर न भरल्यास हुकूमनामा प्रकाशित करून मालमत्ता लिलावात काढली जाणार आहे.मिळालेल्या माहितीनुसार सेंट्रल मॉलचा वर्ष २०१३-१४ पासून कर भरण्यात आलेला नाही. या मॉलचा वर्षाला १ कोटी ६६ लाख २८हजार ५३५ रुपये इतका कर आहे. तळमजल्यासह तीन मजली ही इमारत १५०९.६ चौरस मीटर क्षेत्रात उभारण्यात आलेली आहे. तर वरील मजले प्रत्येकी १४७४.०७ चौरस वर्ग मीटर क्षेत्र आहे.मॉलमध्ये अनेक शो रूम आहेत. त्यामुळे मॉल सील न करता जप्ती कारवाई करण्यात आली आहे. झोन कार्यालयाने नोटीस लावली होती. सुरक्षा रक्षकाने ती फाडली. याची माहिती झोन कार्यालयाला मिळाली. यासंदर्भाती पोलिसात तक्रार करण्याची तयारी झोन कार्यालयाने दर्शविली आहे. ही कारवार्ट लक्ष्मीनगर झोनचे सहायक अधीक्षक प्रकाश गायधने, कर निरीक्षक धनंजय धुमाल, बाबा श्रीखंडे, संजय कापगते, प्रमोद मोगरे आदींनी केली.
सेंट्रल मॉलवर मनपाचा ताबा; लिलाव करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2018 11:26 PM
मालमत्ताकराची थकबाकी न भरल्याने महापालिकेच्या लक्ष्मीनगर झोन कार्यालयाने रामदासपेठ येथील सेंट्रल मॉवर जप्तीची नोटीस बजावली. सेंट्रल मॉलने वर्ष २०१३ पासून मालमत्ताकर न भरल्याने थकबाकी ८ कोटी ९६ लाख ३५ हजार ९४४ रुपये झाली आहे. तसेच यावर ९२.९० लाख रुपये दंड आकारण्यात आला आहे. थकबाकी व दंडाची रक्कम न भरल्यास लवकरच मॉलचा लिलाव केला जाणार आहे.
ठळक मुद्देराष्ट्रभाषा सभेलाही नोटीस : पाच मालमत्ताधारकांकडे ११.६६ कोटींचा कर थकीत