लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मार्च महिन्यात सर्वाधिक संपत्ती कर गोळा होतो. परंतु यावर्षी मार्च महिन्यात हवी तशी वसुली झाली नाही. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी मार्च महिन्यात कर गोळा करण्याचे प्रमाण ४५ टक्के कमी झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मागील वर्षी मार्च महिन्यात ५६ कोटी रुपये गोळा झाले होते. यावर्षी मार्च अखेरपर्यंत ३५ कोटी जमा झाले आहेत. यामुळे संपत्ती करातून होणाऱ्या उत्पन्नावर प्रभाव पडला आहे. खूप प्रयत्न केल्यानंतरही २१५ कोटीपर्यंतच वसुली होणार असल्याचा अंदाज आहे.संपत्तीच्या सर्वेक्षणासोबतच खुल्या प्लॉटला कराच्या अखत्यारित घेण्याचा प्रयत्न संपत्ती कर विभागाने केला. जुनी शिल्लक आणि वर्तमानकाळातील कराच्या आधारे महापालिकेने ४४० कोटी रुपयांच्या जवळपास डिमांड नोट जारी केल्या होत्या. आयुक्त अभिजित बांगर यांनी स्वत: बजेट सादर करताना संपत्ती करातून २७५ कोटी रुपयांपर्यंत उत्पन्नाचे संशोधित लक्ष्य निर्धारित केले होते. परंतु खूप प्रयत्न केल्यानंतरही लक्ष्यापासून खूप मागे राहण्याची पाळी आली. संपत्ती कर विभागाचे सहायक आयुक्त मिलिंद मेश्राम यांनी सांगितले की, ३० मार्चपर्यंत महापालिकेला संपत्ती करापासून २०१ कोटी रुपयांची कमाई झाली आहे. अखेरच्या दिवशी ३.२५ कोटी रुपये वेगवेगळ्या काऊंटरवरून गोळा झाले. अनेक मोठ्या थकबाकीदारांनी चेक जमा केले आहेत. बँकात आरटीजीएस व ऑनलाईन पेमेंटचे आकडे येणे शिल्लक आहे. २१५ कोटी रुपयांच्या जवळपास कर गोळा होण्याचा अंदाज आहे. चार ते पाच दिवसात किती वसुली झाली, याची माहिती मिळणार आहे.अखेरच्या दिवशी निराशाचदरवर्षी ३१ मार्चला महापालिकेला ५ ते ६ कोटींचे उत्पन्न विविध काऊंटरवरून होते. परंतु यावर्षी या उत्पन्नात घट होऊन ३.२५ कोटी रुपयेच झाले. अनेक प्रयत्न करूनही संपूर्ण वर्षभरात कर भरणाऱ्यात कमी उत्साह दिसला. यावर्षी थकबाकीदारांच्या संपत्तीचा सर्वाधिक लिलाव झाला. जाहीरनामा, हुकूमनामा प्रकाशित करण्यात आला, परंतु फायदा झाला नाही. संपत्तीच्या सर्वेक्षणाचे फायदेही दिसत नाहीत.उत्पन्नाचे लक्ष्य गाठण्यात मनपा नापासकिरकोळ वाढ होण्याची शक्यतामागील वित्त वर्षात महापालिकेला संपत्ती करापोटी २१० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. परंतु यावर्षी यात केवळ ४ ते ५ कोटी रुपये वाढ होण्याची शक्यता आहे. संपत्ती कराच्या जवळपास २०० कर्मचाऱ्यांना लोकसभा निवडणुकीसाठी तैनात केल्यामुळे वसुलीत वाढ झाली नसल्याचे कारण सांगण्यात येत आहे. परंतु वसुलीत वाढ होऊ शकली नाही, हे वास्तव आहे.बाजार विभागाची ७५ टक्के वसुलीबाजार विभागासाठी स्थायी समितीने १२ कोटी रुपयांचे लक्ष्य निर्धारित केले होते. मार्च अखेरपर्यंत बाजार विभागाचे एकूण उत्पन्न ९ कोटी ८ लाख ७६ हजार ५७८ रुपये झाले आहे, तर मागील वर्षी ८.०२ कोटी उत्पन्न होऊ शकले. मार्च महिन्यात एकूण २.५० कोटी रुपयांचे उत्पन्न बाजार विभागाने मिळविले. रविवारी सुटीच्या दिवशीही ६० लाखाची वसुली विभागाने केली आहे. ठरविलेल्या उद्दिष्टापैकी ७५ टक्के उत्पन्न मिळविणे विभागासाठी समाधानाची बाब आहे. विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, नियोजनबद्ध पद्धतीने काम केल्यामुळे बाजाराचे उत्पन्न वाढले. यापुढेही लक्ष्यप्राप्तीसाठी पूर्ण प्रयत्न करण्यात येतील.
उत्पन्नाचे लक्ष्य गाठण्यात मनपा नापास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2019 11:39 PM
मार्च महिन्यात सर्वाधिक संपत्ती कर गोळा होतो. परंतु यावर्षी मार्च महिन्यात हवी तशी वसुली झाली नाही. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी मार्च महिन्यात कर गोळा करण्याचे प्रमाण ४५ टक्के कमी झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मागील वर्षी मार्च महिन्यात ५६ कोटी रुपये गोळा झाले होते. यावर्षी मार्च अखेरपर्यंत ३५ कोटी जमा झाले आहेत. यामुळे संपत्ती करातून होणाऱ्या उत्पन्नावर प्रभाव पडला आहे. खूप प्रयत्न केल्यानंतरही २१५ कोटीपर्यंतच वसुली होणार असल्याचा अंदाज आहे.
ठळक मुद्देलक्ष्य ५०९ कोटी, वसुली २१५ कोटी