लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘कोरोना’च्या संकटकाळात शासकीय यंत्रणेसोबत शहरातील सर्व लोकप्रतिनिधी आहेत. पुन्हा लॉकडाऊन लावावा की नाही याबाबत मत-मतांतरे असताना सर्व लोकप्रतिनिधींनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन भूमिका ठरविली. दोन दिवसाचा जनता कर्फ्यू यशस्वी होणे म्हणजे लोकांना लॉकडाऊन नको आहे- असा त्याचा अर्थ आहे. यासाठी सर्व लोकप्रतिनिधी नागरिकांमध्ये जाऊन जनजागृती करणार होते. मात्र या सर्व विषयावर पालकमंत्री नितीन राऊत यांनी घेतलेली भूमिका ही लोकप्रतिनिधींच्या अधिकाराचे हनन करणारी आहे, असा आरोप करीत निषेध म्हणून लोकप्रतिनिधींचा जनजागृती दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती मनपातील सत्तापक्ष नेते संदीप जाधव यांनी मंगळवारी दिली.नागपुरात लॉकडाऊनचा निर्णय प्रशासकीय अधिकारी आणि त्यांची समिती घेईल, असे वक्तव्य नितीन राऊत यांनी सोमवारी केले. त्यांचे वक्तव्य दुर्दैवी आहे. लोकप्रतिनिधींचा हा अपमान आहे. लोकप्रतिनिधी जनतेच्या भावना शासनापर्यंत पोहचविण्याचे आणि त्यांचे प्रश्न शासन दरबारी मांडण्याचे कार्य करीत असतात. त्यामुळे संकटकाळात जनतेच्या भल्यासाठी घेतल्या जाणाºया निर्णयात लोकप्रतिनिधींचाही सहभाग असायलाच हवा. गेल्या काही दिवसापासून नागपूर शहरात पुन्हा लॉकडाऊन लावायचा की नाही यावर चर्चा सुरू असताना पुन्हा १४ दिवसाचा कर्फ्यू लावण्यात येईल, असा अल्टिमेटम प्रशासनातील जबाबदार अधिकाऱ्यांकडून दिला जात आहे. यामुळे शहरात दहशतीचे वातावरण आहे. नागरिकांना पुन्हा लॉकडाऊन नको आहे. पुन्हा लॉकडाऊन नको असेल तर नागरिकांनी, व्यापाऱ्यांनी नियम पाळायला हवे, याबाबत जनजागृती होणे आवश्यक आहे.पदाधिकारी लॉकडाऊनच्या विरोधातमहापौर संदीप जोशी यांच्या पुढाकाराने आयोजित बैठकीत लॉकडाऊनऐवजी जनजागृतीवर भर देण्यात आला. ‘जनता कर्फ्यू’ला नागरिकांनी प्रतिसाद दिला. तसेच २७ ते ३० जुलै दरम्यान सर्व लोकप्रतिनिधी नागरिकांमध्ये जाऊन जनजागृती करणार होते. मात्र पालकमंत्र्यांनी दुर्दैवी वक्तव्य केले. सर्व पालकमंत्री आणि प्रशासकीय यंत्रणाच करणार असेल तर आम्हाला फिरण्याची गरज नाही, हे यातून स्पष्ट होते, असे जाधव म्हणाले.
नागपुरातील लॉकडाऊनला मनपातील पदाधिकाऱ्यांचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 8:41 PM
पालकमंत्री नितीन राऊत यांनी घेतलेली भूमिका ही लोकप्रतिनिधींच्या अधिकाराचे हनन करणारी आहे, असा आरोप करीत निषेध म्हणून लोकप्रतिनिधींचा जनजागृती दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती मनपातील सत्तापक्ष नेते संदीप जाधव यांनी मंगळवारी दिली.
ठळक मुद्देलोकप्रतिनिधींचा जनजागृृती दौराच रद्द लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर पालकमंत्री राजकारण करत असल्याचा आरोप