लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उन्हाळ्यात उष्माघाताचे रुग्ण वाढत असल्याने दरवर्षी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागासमोर उष्माघाताच्या रुग्णांवर उपचारासाठी उपाययोजना कराव्या लागतात. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात शीतकक्षाची स्थापना करावी लागते. आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवावी लागते. परंतु यंदा उन्हाळ्यात उष्माघाताचे रुग्ण आढळलेच नाहीत. त्यामुळे शीतकक्षच स्थापन झाले नाही.उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन किंबहुना उष्माघाताने कुणाचाही मृत्यू होऊ नये म्हणून दरवर्षी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये शीतकक्ष स्थापन करण्यात येतो. एप्रिल महिना संपल्यानंतर मे महिन्यात तापमानात वाढ होते. याच महिन्यात शेतकरी शेतीमध्ये मशागतीचे काम करतात. उन्हातान्हात राबताना उष्माघाताच्या घटना घडतात. उन्हाळ्यात ग्रामीण भागात लग्नसराईसुद्धा मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे उष्माघाताच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होते. शिवाय पाणीटंचाईमुळे ग्रामस्थांना दूषित पाणीपुरवठा होतो, परिणामी आजारपण वाढते. परंतु यंदा उन्हाळा संपूनही उष्माघाताचे रुग्ण आढळले नाहीत. त्यामुळे आरोग्य विभागाला शीतकक्ष स्थापन करण्याच्या भानगडी कराव्या लागल्या नाहीत. उष्माघाताचे रुग्ण न आढळण्यास कोरोना इफेक्ट म्हणावा लागेल. सरकारने २३ मार्चपासून देशभरात लॉकडाऊन केले. ग्रामीण भागात लॉकडाऊनचे कडेकोट पालन करण्यात आले. त्याचा परिणाम म्हणून जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढली नाही. कोरोनामुळे शेतीचे कामेही ठप्प पडलीत. मे महिन्यात तापमान ४७ वर पोहचले पण दोन-चार दिवसच उन्हाचे चटके सहन करावे लागले. हवामान खात्याच्या अंदाजानुसार अनेक वर्षानंतर पहिल्यांदा अतिशय कमी दिवस उन्हाचे चटके नागपूरकरांना बसले. कोरोनामुळे सामूहिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली. वाहतुकीची साधने बंद करण्यात आली. त्यामुळे ग्रामीण भागात लग्नसोहळे साजरे झाले नाहीत. वाहतुकीची साधने बंद असल्याने प्रत्येकजण आपल्याच घरात बसून होता. त्यामुळे उष्माघाताचे रुग्ण वाढले नाहीत. त्या अनुषंगाने आरोग्य विभागाला उष्माघातावर उपाययोजना करण्यासाठी शीतकक्ष स्थापन करावा लागला नाही. त्यासाठी कु लरची व्यवस्था, औषधांची व्यवस्था, उष्माघाताच्या रुग्णांसाठी औषधांचा मुबलक साठा ठेवावा लागला नाही.फक्त कोरोनावर लक्षकोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने इतर उपक्रमांपेक्षा कोरोनावर अधिक लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे ग्रामीण भागात राबविण्यात येणारे इतर सर्व उपक्रम बंद करण्यात आले. यंदा तापमानही जाणवले नाही. प्रत्येकजण घरातच असल्यामुळे उष्माघाताचे रुग्ण आढळले नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
यंदा उन्हाळ्यात शीतकक्ष स्थापनच झाले नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2020 9:46 PM
उन्हाळ्यात उष्माघाताचे रुग्ण वाढत असल्याने दरवर्षी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागासमोर उष्माघाताच्या रुग्णांवर उपचारासाठी उपाययोजना कराव्या लागतात. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात शीतकक्षाची स्थापना करावी लागते. आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवावी लागते. परंतु यंदा उन्हाळ्यात उष्माघाताचे रुग्ण आढळलेच नाहीत. त्यामुळे शीतकक्षच स्थापन झाले नाही.
ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यात आढळले नाहीत उष्माघाताचे रुग्ण : कोरोना इफेक्ट