नागपूर : मागील दहा दिवसांपासून कोरोनाचा संसर्गाने एकाही रुग्णाचा मृत्यूची नोंद झाली नाही. मृत्यूची संख्या स्थिरावल्याने आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे. सोमवारी नागपूर जिल्ह्यात ६ रुग्णांची नोंद झाली. रुग्णांची एकूण संख्या ४,९२,८२२ झाली असून मृतांची संख्या १०,११५ वर स्थिर आहे.
कोरोनाची दुसरी लाट ओसरताच चाचण्यांची संख्याही कमी झाली आहे. आज ३११७ तपासण्या झाल्या. यात शहरातील २९०७ तर ग्रामीण भागातील २१० चाचण्यांचा समावेश होता. सध्या सक्रिय रुग्णांची संख्या २२४ आहे. यात शहरातील १७३ ग्रामीण भागातील ४४ तर जिल्ह्याबाहेरील ७ रुग्ण आहेत. नागपूर जिल्ह्यात ५२ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू असून होम आयसोलेशनमध्ये १७२ कोरोनाबाधित आहेत. आज ९ रुग्ण बरे झाले. रुग्ण बरे होण्याचा दर ९७.९० टक्क्यांवर पोहचला आहे.