योेगेश पांडे नागपूरसाधारणत: कुठलीही परीक्षा घेत असताना ऐनवेळी गोंधळ नको म्हणून परीक्षा अर्जांच्या प्रमाणाहून जास्त प्रश्नपत्रिका छापण्यात येतात. परंतु परीक्षेच्या वेळी प्रश्नपत्रिका कमी पडल्या तर विलंबाने परीक्षा अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षाच देता येणार नाही अशी अजब अट ’एमएसबीटीई’ने (महाराष्ट्र स्टेट बोर्ड आॅफ टेक्निकल एज्युकेशन) टाकली आहे. परीक्षा अर्ज भरण्यासाठी उशीर झालेल्या ‘पॉलिटेक्निक’ अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसमोर ’एमएसबीटीई’ अशा प्रकारच्या अटींमुळे एक नवीन पेच निर्माण झाला आहे. ‘एमएसबीटीई’च्या धोरणांमुळे शेकडो विद्यार्थ्यांना इच्छा असूनदेखील उन्हाळी परीक्षांसाठी अर्ज भरता आलेला नाही. अशा शेकडो विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उन्हाळी परीक्षांसाठी परीक्षा अर्ज भरण्याची अखेरची तारीख ६ फेब्रुवारी होती. तर १५०० रुपये विलंब शुल्कासह ‘आॅनलाईन’ अर्ज भरण्याचा अखेरचा दिनांक ७ मार्च हा होता. वार्षिक प्रणाली तसेच ‘जी’ योजनेअंतर्गत येणाऱ्या जुन्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी हीच मुदत १५ मार्च अशी होती. परंतु अनेक विद्यार्थ्यांना काही कारणांमुळे निर्धारित मुदतीत अर्ज भरता आले नाही. काही विद्यार्थ्यांना महाविद्यालयांच्या तांत्रिक चुकांचा फटका बसला.
प्रश्नपत्रिका कमी पडल्या तर ‘नो एन्ट्री’!
By admin | Published: April 01, 2015 2:19 AM