शहराच्या वाहतूक व्यवस्थेचा घेतलेला हा सचित्र आढावा. उत्तम रस्ते, वाहकांची सुरळीत निकासी व्हावी म्हणून केलेल्या उत्तम योजना, सिग्नल्स, सीसीटीव्ही आणि सोबतीला वाहतूक पोलीस, अशी सगळी व्यवस्था. कायदा सगळ्यांनाच कळेल, असे सगळेच सुजाण अन् सुशिक्षित तरी मात्र मुजोरी न करेल तो नागपूरकर कसला? ही अवसानघातकी वृत्ती. ही सगळी छायाचित्रे अतिशय गजबजलेल्या पंचशिल चौकातील आहेत. प्रत्येक मार्गाला जाणाऱ्या किंवा येणाऱ्या थांब्यावर झेब्रा क्रॉसिंगही आहे. मात्र, घाई आपणा सगळ्यांच्या पाचवीलाच पुजलेली. सिग्नलवर लाल दिवा लागला असताना झेब्रा क्रॉसिंगच्या मागे वाहने रोखावी हा नियम असतानाही, काही जण मुद्दामहून एखाद्या सुपरस्टारप्रमाणे वाहन पुढे आणून थांबतात. एवढेच नव्हे तर रस्ता पार करणाऱ्यांसाठी असलेली झेब्रा क्रॉसिंगची लाईन असूनही अनेक जण मध्यातून पायी चालतात. कुणी सर्रास सिग्नल तोडून पसार होतात. कुटुंब सोबत असतानाही, सिग्नल तोडण्याचे शौर्य आपले नागरिक करतात. एखादे जड वाहन सोडाच, साधी दुचाकीही पुढून आली तर वेगाने आणि गफलतीने होणारा अपघात जीवावरच बेतेल ना. अशी अनेक उदाहरणे असतानाही कुणालाच का पर्वा नाही, हे दुर्दैव.
....................
‘’?!