नागपूर : इंधन समायोजन शुल्क वाढवून वीज महाग करणाऱ्याला महावितरणला आता नवीन कनेक्शनसाठी मीटर देणेही कठीण झाले आहे. फॉल्टी मीटर बदलविणे तर दूरच राहिले. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, कामगारनगर येथील नागोरावजी डोंगरे यांच्यासह हजारो ग्राहकांच्या घरात फॉल्टी मीटर लागले आहेत. अनेकदा तक्रार केल्यानंतरही अधिकारी ही समस्या सोडविण्याकडे लक्ष देत नाही आहेत. परिणामी या ग्राहकांना जास्तीचे बिल भरावे लागत आहे.
महावितरण मीटरबाबत केवळ कागदी कारवाई करण्यात व्यस्त आहे. त्यांचे म्हणणे आहे की, एप्रिल ते जूनपर्यंत तीन महिन्यांत त्यांनी १४,५९८ मीटर देऊन नवीन कनेक्शन दिले आहेत. अनेक ग्राहकांचे म्हणणे आहे की, त्यांनी बाजारातून दुप्पट किमतीवर मीटर खरेदी करण्यास बाध्य करण्यात आले आहे.
४९,९५६ नवीन कनेक्शन
मीटरची प्रचंड टंचाई असताना २०२१-२२ मध्ये ४९,९५६ नवीन कनेक्शन देण्यात आला असल्याचा दावा महावितरणने केला आहे. परंतु, शहरातील फॉल्टी मीटर बदलविण्याबाबत मात्र आतार्पंत मोहीम चालविण्यात आलेली नाही. यामुळे ग्राहकांचे नुकसान होत आहे.
वीज बिलही महागले
मीटरच्या टंचाईदरम्यान वीज बिलही वाढले आहे. महावितरणने मागच्याच महिन्यात इंधन समायोजन शुल्क पुन्हा सुरू केले आहे. यामुळे वीज प्रति मीटर २० पैशांनी महागले आहे. दुसरीकडे एसी, कुलरचा अत्याधिक वापर व मागणी वाढल्याने वीज बिल महागले असल्याचे महावितरणचे म्हणणे आहे.
१०,८०८ मीटर उपलब्ध
महावितरणने जिल्ह्यात १०,८०८ मीटर उपलब्ध असल्याचा दावा केला आहे. नवीन कनेक्शन व फॉल्टी मीटर बदलविण्यासाठी मीटरची कुठलीही कमतरता नाही. नवीन मीटरसाठी प्रतीक्षा करायची गरज नाही. कंपनीने सिंगल फेडचे १२.८० लाख नवीन स्मार्ट मीटर खरेदी करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. राज्यात ३२ लाख ८० हजार नवीन मीटर लवकरच टप्प्याटप्प्याने उपलब्ध होतील.
बाजारातसुद्धा थ्री फेज मीटर नाही
थ्री फेज मीटर बाजारातही उपलब्ध नाही. या मीटरसाठी महावितरण १७५० रुपये घेते, तर हेच मीटर बाजारात ४५०० रुपयांच्या दरावर विकले जात आहेत. परंतु, आता बाजारातही याची टंचाई निर्माण झाली आहे.