लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापौर संदीप जोशी यांनी पत्रकार परिषदेत महानगराला अतिक्रमणमुक्तकरण्यावर भर दिला. त्यानंतर मनपाने नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून झोन स्तरावर अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरू केली. मात्र ही कारवाई नावापुरतीच ठरली आहे. अतिक्रमणच्या दुसऱ्या दिवशीच पुन्हा नव्याने अतिक्रमण होत असल्याने या कारवाईचा धाक उरला आहे की नाही, अशी शंका घेण्यासारखे वातावरण निर्माण झाले आहे.मनपाचे अतिक्रमण विरोधी पथक कारवाई करते. मात्र दुसऱ्याच दिवशी पुन्हा अतिक्रमण होते. नंतर महिनाभर त्याचा पथकाला पत्ताही नसतो. कारण एकदा कारवाई केल्यावर दुसऱ्यांदा हे पथक महिनोंमहिने फिरकतच नाही. मागील अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू असल्याने कारवाईचा धाक कुणालाच वाटत नाही. आसीनगर, गड्डीगोदाम, कस्तूरचंद पार्क, मोमिनपुरा, बेसा बेलतरोडी यासह अनेक भागात अतिक्रमण उठवून परिसर मोकळा करण्यात आला होता. मात्र पुन्हा परिस्थिती जैसे थे झाली आहे.पथकाने आसीनगर झोनपर्यंतचे अतिक्रमण उठविले होते. मात्र ही कारवाई बिनकामाची ठरली. परिसरात सिमेंटीकरण करून मार्ग उत्तम बनविले आहेत. तरीही अतिक्रमणामुळे येथे वाहतूक कोंडीचा अनुभव नेहमीच येतो.२२ जानेवारीला धंतोली झोनमधील बेलतरोडी चौक ते मनीषनगर रेल्वे क्रॉसिंगपर्यंतचे अतिक्रमण हटविले होते. साहित्यही जप्त केले होते. मात्र दुसºया दिवशी पुन्हा दुकाने बसली.मंगळवारी गिट्टीखदान चौक व परिसरात सहायक आयुक्त अशोक पाटील यांच्या नेतृत्वात कारवाई झाली. मात्र पथक जाताच पुन्हा अतिक्रमण उभारणे सुरू झाले. महाल झोनअंतर्गत गांधी गेटसह मनपा झोनल कार्यालयाला लागून असलेले अतिक्रमणही हटविण्यात आले होते. मात्र दुसºयाच दिवशी परिस्थिती जुन्यासारखीच झाली.मोमिनपुरामध्ये काहीच फरक नाहीमोमिनपुरामध्ये अतिक्रमण विरोधी पथकाने दोन दिवसांपूर्वी कारवाई केली. ८० अतिक्रमणे हटविली. दिवसभर कारवाई चालली. मात्र दुसऱ्याच दिवशी पुन्हा परिस्थिती जैसे थे झाली. रस्ते पूर्वीसारखेच अरुंद झाले. बोरियापुरा रोड, टिमकी रोड, जामा मस्जिद रोडवर तर अतिक्रमणाची कारवाई झाल्यासारखे दुसºया दिवशी वाटतच नव्हते.कस्तूरचंद पार्कजवळ उभारले शेडकस्तूरचंद पार्कच्या सुरक्षा भिंतीला लागूनच अतिक्रमण उभारण्यात आले होते. पथकाने ते हटविलेही. पथक परत जाताच काही वेळातच पुन्हा अतिक्रमण बसले. कस्तूरचंद पार्कच्या भिंतीला लागूनच सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. फूटपाथही करण्यात आले असले तरी त्यावरही अतिक्रमण पसरले आहे.
मनपाच्या अतिक्रमण विरोधी अभियानाची कुणालाच नाही भीती ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 1:02 AM
अतिक्रमण हटवण्याच्या दुसऱ्या दिवशीच पुन्हा नव्याने अतिक्रमण होत असल्याने या कारवाईचा धाक उरला आहे की नाही, अशी शंका घेण्यासारखे वातावरण निर्माण झाले आहे.
ठळक मुद्देपथक परतताच उभारले जाते अतिक्रमण : कायमस्वरूपी नियोजनाचा अभाव