शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलसोबत युद्ध सुरू असतानाच इराणचं मोठं विधान; म्हणाला- नेतन्याहू या शतकातील 'नवा हिटलर, तर भारत..."
2
“भाजपाने आधीच हार मानली, २०२४ च्या विधानसभेला मविआचेच सरकार येणार”; नाना पटोलेंचा दावा
3
शरद पवार शिंदे गटाला धक्का देणार! तानाजी सावंतांचे पुतणे अनिल सावंत राष्ट्रवादीत प्रवेश करणार
4
विरुष्काचे अनोखे 'क्रिकेट'! अनुष्काने वाचला नियमांचा पाढा; विराटने डोक्यालाच हात लावला
5
इस्त्रायलचे 'ते' ३ मित्र जे संकटात बनतात सुरक्षा कवच; ज्यांनी इराण हल्ल्यातून वाचवले
6
IPO News : आयपीओंचा महापूर येणार, एकाच दिवसात १३ कंपन्यांनी सेबीकडे केले अर्ज
7
बिहार : हवाई दलाचे हेलिकॉप्टर पुराच्या पाण्यात पडले; अंगावर काटा आणणारे दृश्य, पूरस्थिती कायम
8
Mohammad Shami, Team India, IND vs AUS: टीम इंडियाला मोठा धक्का! मोहम्मद शमी रूग्णालयात, ६ ते ८ आठवड्यांसाठी सक्तीची विश्रांती
9
काही लोक गांधीजींचा विचार विसरले, फक्त त्यांच्या नावाने मते घेतली; मोदींचा टोला
10
खळबळजनक! नागपूर जिल्ह्यात कुटुंबाची सामूहिक आत्महत्या; पती-पत्नीसह दोन मुलांनी घेतला गळफास
11
अरे बापरे! 2000 कोटींचे ड्रग्ज जप्त, दिल्लीत चार जणांना अटक
12
५० वर्षानंतर अमेरिकेत पहिल्यांदाच 'असं' काय घडलं?; चीन-पाकिस्तानही चिंताग्रस्त
13
अरे बापरे! लोकांच्या डोळ्यातून येतंय रक्त; खतरनाक इबोलासारखा जीवघेणा आहे 'हा' व्हायरस
14
लाडक्या बहि‍णींची दिवाळी; भाऊबीजेची ओवाळणी ऑक्टोबरलाच, सरकार नोव्हेंबरचे पैसे आधीच देणार
15
प्रशांत किशोर : UN मध्ये ८ वर्षे नोकरी, निवडणूक रणनीतीकार ते राजकीय पक्ष... आठ पक्षांसोबत केलंय काम!
16
56 वर्षांनंतर सापडला हवाई दलातील शहीद जवानाचा मृतदेह; 23व्या वर्षी आलेले हौतात्म्य
17
"हानिया अन् हसन नसरल्लाह...", इस्रायलवरील मिसाइल हल्ल्यानंतर काय म्हणाला इराण?
18
Numerology: ‘या’ ७ मूलांकांवर देवीची कृपा, सुख-समृद्धीचा लाभ; कामात यश, अचानक धनलाभ!
19
भयानक! रोलर कोस्टरवरची मजा बेतली जीवावर; ५ वर्षांच्या मुलाला आला कार्डिएक अरेस्ट
20
सणासुदीत विना टेन्शन खरेदी करू शकाल इलेक्ट्रिक गाड्या, सरकारनं सुरू केली नवी सब्सिडी स्कीम

निधीची मलमपट्टी, औषधीसाठी लिहून दिली जाते बाहेरची चिठ्ठी; मेयो, मेडिकल, सुपरचे हाल कधी संपणार?

By सुमेध वाघमार | Published: October 16, 2023 11:50 AM

३३ कोटींच्या औषधांची खरेदी नाही : मेयो, मेडिकल, ‘सुपर’मध्ये गरीब रुग्ण मरणाच्या दारावर

नागपूर : मेयो, मेडिकल व सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये विदर्भासह मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगाणा येथून मोठ्या आशेने रुग्ण येतात. परंतु हाफकिन महामंडळाकडून मागील दोन वर्षांपासून औषधांचा पुरवठा नाही. स्थानिक पातळीवर औषधांची खरेदी केली जात असलीतरी त्याची ३० टक्के मर्यादा संपली आहे. मागील आठवड्यात जिल्हाधिकारी यांनी तिन्ही रुग्णालये मिळून औषधी व सर्जिकल साहित्य खरेदीसाठी ३३ कोटींचा निधी दिला. परंतु रुग्णांच्या हातात औषधी पडेपर्यंत एक महिन्याचा कालावधी लागणार आहे. दुसरीकडे औषधी पुरवठादाराची बिले थकल्याने स्थानिक पातळीवर औषधी खरेदीला मर्यादा आल्या आहेत. यातच बाहेरुन औषधी लिहुन दिल्यास कारवाई होईल, या भीतीने डॉक्टर औषधांच्या चिठ्ठ्या देत नाहीत. एकूणच रुग्णांच्या जीवाशी खेळणारा हा प्रकार थांबणार तरी कधी, हा प्रश्न आहे.

१० दिवस उलटूनही औषधांची खरेदी नाही

'लोकमत'ने  3 ऑक्टोबर रोजी 'औषधांच्या तुटवड्यामुळे  मेयो, मेडिकलमध्येही होऊ शकते मृत्यूचे तांडव!' या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करताच ५ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर  यांनी या दोन्ही रुग्णालयांचा आढावा घेतला. त्यांनी औषधी व सर्जिकल साहित्य खरेदीसाठी मेडिकल व सुपर स्पेशालिटी डॉस्पीटलला प्रत्येकी १३ कोटी, त मेयोला ७ कोटी असे ३३ कोटी दिले, परंतु, १० दिवस उलटूनही औषधांची खरेदी नाही.

औषधी पुरवठादाराचीही लाखोंची बिले थकली

हाफकिन महामंडळाकडून मेडिकलला मागील वर्षी २५४ औषधांपैकी २२, तर यावर्षी  केवळ ३ औषधी मिळाल्या. स्थानिक पातळीवर ३० टक्के औषधी खरेदी करण्याची मुभा असली तर कोटेशन व दरपत्रकानुसार औषधी खरेदी करता येतात. मात्र, औषधी पुरवठादाराची जुनी बिले थकलेली असल्याने औषधांचा पुरवठा थांबलेला आहे. मेडिकल व सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल मिळून सुमारे ५० लाखांची बिले थकलेली असल्याची माहिती आहे. 

मेयोत मंजुरी ५९४ खाटांना, मात्र ८५० रुग्णांवर उपचार

इंदिरा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) ५९४ रुग्ण खाटांना मंजुरी प्राप्त आहे. मात्र, रुग्णांची वाढती संख्या पाहता ८५० खाटांवर रुग्णसेवा दिली जाते. त्या तुलनेत औषधी, सर्जिकल साहित्य, उपकरणे व इतरही साहित्यांच्या खरेदीसाठी सरकार वर्षाला ६ कोटी रुपयांचे अनुदान देते. मागील जवळपास ३३ वर्षांपासून या अनुदानात वाढ नाही. एकीकडे औषधांच्या किमती वाढल्या असतानाही दुसरीकडे वाढीव अनुदान नसल्याने केवळ भरती असलेल्या रुग्णांना औषधे दिले जात असल्याचे वास्तव आहे.

औषधीच् नसल्याने शस्त्रक्रिया, भरती प्रक्रिया प्रभावित

अॅण्टीबायोटिकसह महत्त्वाचे इंजेक्शन व औषधी नसल्याने तिन्ही रुग्णालयातील शस्त्रक्रिया व रुग्णांची भरती प्रक्रिया प्रभावित झाल्याचे चित्र आहे. आवश्यक औषधीच नसल्याने रुग्णांवर उपचार कसे करणार, असे खुद्द डॉक्टरांचे म्हणणे आहे.

बाहेरून औषधी लिहून देण्याची डॉक्टरांनाच भीती

मेयो, मेडिकल व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सुमारे ४० ते ४५ टक्के औषधी नाहीत. असे असताना, बाहेरून औषधी लिहून देऊ नका, अशा सूचना आहेत. लिहून दिल्यास कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येईल, असेही सांगण्यात आले आहे. यामुळे डॉक्टरांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

अनुदान कधी वाढणार?

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) १४०० खाटांना मंजुरी आहे. परंतु, रुग्णांची वाढत्या संख्येमुळे रुग्णालय प्रशासनाला जवळपास २२०० खाटा उपलब्ध करून द्याव्या लागतात. अतिरिक्त ८०० खाटांचा भार सहन करावा लागतो. सरकार औषधी व सर्जिकल साहित्यासह इतर सामग्री खरेदी करण्यासाठी दरवर्षी ९ कोटी ९९ लाख अनुदान देते. मागील ५० वर्षांपासून यात वाढ नसल्याने याचा. फटका रुग्णांना बसत आहे.

टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटलnagpurनागपूर