लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्क्रब टायफस हा कीडा चावल्याने नाही तर त्याच्या ‘लारव्हा’चा शरीराशी संपर्क आल्याने धोकादायक ठरू शकतो. त्यावर वेळीच उपचार झाले नाही तर शरीरातील अवयव निकामी होते आणि मृत्यू होतो, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवई यांनी आरोग्य समितीच्या बैठकीत दिली.जि.प.चे उपाध्यक्ष शरद डोणेकर यांच्या अध्यक्षतेत आरोग्य समितीची बैठक पार पडली. बैठकीत सदस्यांनी स्क्रब टायफसच्या बाबतीत चिंता व्यक्त करीत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासंदर्भात आरोग्य अधिकाऱ्यांना विनंती केली. यावेळी डॉ. सवई म्हणाले की, स्क्रब टायफसला झाडेझुडपे आणि उंदीर हे जबाबदार आहे. स्क्रब टायफसचा कीडा लारव्हा झाडेझुडपाला चिटकून राहतो. मानव या लारव्हाच्या संपर्कात आल्यास तो आजाराला बळी पडतो. कीडा चावल्याने स्क्रब टायफस होत नाही तर लारव्हा हा घातक असतो. उंदरामुळे हा आजार शहरात पसरत आहे. उंदीर हे झाडाझुडपातून फिरत असताना त्यांच्या शरीरावर हा लारव्हा बसतो. घरामध्ये उंदरांमुळे हा आजार पसरतो. डॉ. सवई यांनी ज्या रुग्णांना स्क्रब टायफस झाला आहे त्या रुग्णांच्या घराचे सर्वेक्षण केले असता, या बाबी आढळून आल्याचे ते म्हणाले.- जिल्ह्यात २१ रुग्ण, ५ मृत्यूनगरपालिकेच्या क्षेत्रात या आजाराचे ९ व ग्रामीण भागात १२ रुग्ण आढळले आहेत. यातील पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनेबरोबरच स्क्रब टायफसचे लक्षण आढळल्यास पॅरासिटॉमॉल टॅब्लेट, डॉक्सिसायक्लीन व अॅझीथ्रोमायसीन हे औषध घ्यावे. सर्व ग्रामीण आरोग्य केंद्रांमध्ये हे औषध उपलब्ध आहे.- ग्रा.पं. व नगरपालिकेने करावी उपाययोजना२ सप्टेंबर ते २ आॅक्टोबरदरम्यान स्वच्छ भारत अभियान गावागावात राबवायचे आहे. डेंग्यू, स्क्रब टायफस यासारख्या आजाराचा होत असलेला उद्रेक लक्षात घेता, ग्रा.पं.ने त्यांच्या हद्दीतील झाडेझुडपे तणनाशकाने नष्ट करावे. गटार, कचºयाचे उकीरडे, शेणाच्या उकीरड्यावर मॅलिथियम पाडवर टाकावे. नागरिकांनी घरातील व परिसरातील उंदरांची बिळे नष्ट करावीत. यासंदर्भातील उपाययोजना करण्यासंदर्भात सर्व ग्रा.पं., नगरपालिकांना सीईओंनी सूचना केल्या आहेत. त्यामुळे आजाराचे उद्रेक लक्षात घेता गावकºयांच्या आरोग्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन उपाध्यक्ष शरद डोणेकर यांनी केले आहे.
स्क्रब टायफसचा कीडा नाही ‘लारव्हा’ धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2018 1:20 AM
स्क्रब टायफस हा कीडा चावल्याने नाही तर त्याच्या ‘लारव्हा’चा शरीराशी संपर्क आल्याने धोकादायक ठरू शकतो. त्यावर वेळीच उपचार झाले नाही तर शरीरातील अवयव निकामी होते आणि मृत्यू होतो, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवई यांनी आरोग्य समितीच्या बैठकीत दिली.
ठळक मुद्देउंदरांवर ठेवा अंकुश : जि.प.च्या आरोग्य विभागाकडून सतर्कतेचे आवाहन