लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील वाढते तापमान बघता महावितरणच्या नागपूरकर वीज ग्राहकांची दुपार सुसह्य करण्याचा निर्णय महावितरणने घेतला असून देखभाल व दुरुस्तीचे काम तूर्तास उर्वरित उन्हाळाभर सकाळी ११ च्या पूर्वी केले जाणार आहे. महावितरणने हिट अॅक्शन प्लॅन तयार केला असून सकाळी ११ वाजतानंतर आता ‘नो शटडाऊन’ म्हणजेच वीज जाणार नाही.मान्सूनपूर्व तयारीच्या कामात महावितरणने गती पकडली आहे. ही कामे लवकरात लवकर पूर्ण करावयाची याशिवाय नियमित देखभाल व दुरुस्ती सोबतच महामेट्रोच्या अत्यावश्यक कामांसाठी वेगवेगळ्या भागातील वीजपुरवठा रीतसर पूर्वसूचना देऊन काही वेळेपुरता स्थगित केला जात आहे. अनेकदा दुपारभर ही कामे चालत असल्याने संबंधित भागाचा वीजपुरवठा काही तासांसाठी बंद केल्या जातो, मात्र मागील काही दिवसांपासून नागपुरात अंग पोळून काढणारे तापमान बघता देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी सकाळी ११ वाजताच्या पुढे वीजपुरवठा खंडित न करण्याचा निर्णय महावितरणच्या काँग्रेसनगर विभागाने घेतला आहे. यामुळे देखभाल व दुरुस्तीच्या सर्व कामांकरिता नागपुरातील महावितरणच्या ग्राहकांना पूर्वसूचना देऊन सकाळी ११ पूर्वीच वीजपुरवठा बंद केला जाणार आहे.मागील काही दिवसांपासून नागपूरकरांना प्रचंड उन्हाळ्याला सामोरे जावे लागत आहे. पाऱ्याने सातत्याने चाळीशी ओलांडली आहे. अशावेळी देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी वीजपुरवठा बंद केल्याने ग्राहकांना प्रचंड मन:स्ताप होतो, सोबतच देखभाल व दुरुस्तीच्या कामावरील कर्मचाऱ्यांनाही कडक उन्हाचा त्रास होतो, हे लक्षात घेता किमान उन्हाळ्यात तरी वीज ग्राहकांना यात दिलासा मिळावा याकरिता महावितरणच्या शहर मंडलाचे अधीक्षक अभियंता दिलीप दोडके आणि काँग्रेसनगर विभागाचे कार्यकारी अभियंता कुंदन भिसे यांनी हा निर्णय घेतला आहे.या निर्णयाची अंमलबजावणी यापूर्वीच सुरू करण्यात आली आहे. प्रचंड उष्णता व विजेचा वाढीव भार यामुळे वीज वितरण यंत्रणेत एखादा तांत्रिक दोष निर्माण झाल्यास दुपारीही वीजपुरवठा खंडित होऊ शकतो. हा बिघाड त्वरित दुरुस्त करून वीजपुरवठा सुरळीत करेपर्यत ग्राहकांनी महावितरणला सहकार्य करावे तसेच खंडित वीजपुरवठा किंवा विजेसंबंधी तक्रारीसाठी १९१२ किंवा १८००२३३३४३५अथवा १८००१०२३४३५या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही महावितरणतर्फे करण्यात आले आहे.
नागपुरात आता सकाळी ११ नंतर वीज जाणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 9:54 PM
शहरातील वाढते तापमान बघता महावितरणच्या नागपूरकर वीज ग्राहकांची दुपार सुसह्य करण्याचा निर्णय महावितरणने घेतला असून देखभाल व दुरुस्तीचे काम तूर्तास उर्वरित उन्हाळाभर सकाळी ११ च्या पूर्वी केले जाणार आहे. महावितरणने हिट अॅक्शन प्लॅन तयार केला असून सकाळी ११ वाजतानंतर आता ‘नो शटडाऊन’ म्हणजेच वीज जाणार नाही.
ठळक मुद्देदुपारी ‘नो शटडाऊन’ : महावितरणने जारी केला‘हिट अॅक्शन प्लान’