शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
2
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
3
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
4
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
5
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
6
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं
7
IPL 2025 : 'त्या' बिचाऱ्याला जमिनीवर आणलं; पण 'स्टारडम कल्चर'मुळं विराटचा लाड?
8
राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
9
भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू
10
भिवंडीत कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ नवजात बाळाचे मृतदेह सापडले, परिसरात खळबळ!
11
Numerology: आयुष्याला कलाटणी देणारा सप्ताह; मुलांकानुसार जाणून घ्या साप्ताहिक भविष्य!
12
गरीब बिचारे! भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या पगारात तब्बल 'इतक्या' कोटींचा फरक
13
राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल
14
बोलणं बंद केलं म्हणून बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच विष पाजलं; उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू
15
बंगळुरुत हवाई दलाच्या अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; पत्नीला शिवीगाळ, पाहा धक्कादायक VIDEO
16
विराट कोहलीकडून बॅट मिळाल्यानंतर मुशीर खानचा आनंद गगनात मावेना! पाहा व्हिडिओ
17
'आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा आदर करतो, पण...' रामदास आठवलेंचे मोठे वक्तव्य
18
रेशनकार्डधारकांना KYC करण्याची अंतिम मुदत; यानंतर हटवलं जाणार नाव; मोबाईलवरुन करा प्रोसेस
19
LIC नं 'या' बँकेचे खरेदी केले १०.४५ कोटी शेअर्स, किंमत ₹२५० पेक्षाही कमी; आता गुंतवणूकदारांच्या उड्या
20
सलग पाचव्या दिवशी बाजारात तेजी; निफ्टी बँक विक्रमी उच्चांकावर, कोणत्या शेअर्समध्ये घसरण?

मृताच्या संपत्तीवर नॉमिनी अधिकार सांगू शकत नाही; हायकोर्टाचा निर्णय, वारसदारच हक्कदार

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: February 14, 2025 08:45 IST

नॉमिनी अधिकृत वारसदार नसेल तर, त्याचा मृत व्यक्तीच्या संपत्तीवर काेणताही अधिकार नसतो.

राकेश घानोडेनागपूर : नॉमिनी अधिकृत वारसदार नसेल तर, त्याचा मृत व्यक्तीच्या संपत्तीवर काेणताही अधिकार नसतो. अशा संपत्तीचे खरे हक्कदार मृताचे अधिकृत वारसदारच असतात. त्यामुळे संबंधित संपत्ती वारसदारांमध्ये सारख्या प्रमाणात वितरित करणे आवश्यक आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फलके यांनी दिला.नागपुरातील दिवंगत गोपालकृष्ण शिवहरे यांना लक्ष्मीकांत व श्रीराम ही दोन मुले आणि शैल व संतोष या दोन मुली होत्या. शैल यांनी लक्ष्मीकांत यांचा मुलगा अभिषेकला दत्तक घेतले होते. त्या महापालिकेच्या ग्रंथालय विभागात कर्मचारी होत्या. सेवानिवृत्तीनंतर त्यांचा ६ मे २०१३ रोजी मृत्यू झाला. त्यांनी अभिषेकला बँक खात्यांमध्ये नॉमिनी केले होते. त्यामुळे अभिषेकने शैल यांच्या निधनानंतर त्यांच्या बँक खात्यातील ९० हजार १५० रुपये काढले आणि उर्वरित रक्कमही काढण्याचे प्रयत्न सुरू केले होते. त्यावर श्रीराम व संतोष यांनी आक्षेप घेतला होता. हे प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचल्यानंतर अभिषेकची कृती अवैध ठरविण्यात आली. 

नॉमिनीला केवळ बँक खातेधारकाचे अधिकार प्राप्त होतात. खातेधारकाच्या मृत्यूनंतर बँकेतील रक्कम नॉमिनी काढू शकतो. परंतु, नॉमिनी त्या रकमेचा मालक बनत नाही. ती रक्कम वारसाहक्कानुसारच वितरित करावी लागते, असेही उच्च न्यायालयाने निर्णयात नमूद केले.श्रीराम व संतोष यांनी शैल यांच्या बँक खात्यातील रक्कम स्वत:सह लक्ष्मीकांत यांना वाटप व्हावी, यासाठी सुरुवातीला वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात अर्ज केला होता. परंतु, या न्यायालयाने या तीन वारसदारांना केवळ ६० हजार ९९३ रुपयांत वाटा दिला होता.श्रीराम व संतोष यांनी वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाचा निर्णय अमान्य करून त्याविरुद्ध जिल्हा न्यायालयात अपील दाखल केले होते. जिल्हा न्यायालयाने वादग्रस्त निर्णयात बदल करून तीन वारसदारांना १५ लाख १२ हजार १५६ रुपयांमध्ये वाटा दिला.

टॅग्स :nagpurनागपूर