शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

धर्मांतर न केलेल्या दलितांनी संघर्ष करावा

By admin | Published: October 03, 2016 3:06 AM

राज्यघटनेत अनुसूचित जातीसाठी आरक्षणाची तरतूद केली. परंतु अनुसूचित जातीतील काही घटक त्यापासून वंचित राहून विकासाच्या प्रक्रियेपासून कोसोदूर गेले.

मधुकर कांबळे : राष्ट्रीय सामाजिक न्याय समीक्षा आरक्षण वर्गीकरण परिषदनागपूर : राज्यघटनेत अनुसूचित जातीसाठी आरक्षणाची तरतूद केली. परंतु अनुसूचित जातीतील काही घटक त्यापासून वंचित राहून विकासाच्या प्रक्रियेपासून कोसोदूर गेले. मोजक्याच लोकांना आरक्षणाचा लाभ मिळाला. त्यामुळे आरक्षणाचे वर्गीकरण करून वंचित घटकांना सामाजिक न्याय उपलब्ध करून देण्यासाठी अधर्मांतरित दलितांनी एकत्र येऊन संघर्ष करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय दलित नेते तथा मातंग आरक्षण चळवळीचे प्रमुख मधुकर कांबळे यांनी केले.चिटणवीस सेंटरच्या बनयान सभागृहात राष्ट्रीय सामाजिक न्याय समीक्षा आरक्षण वर्गीकरण परिषदेत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. परिषदेला मादिंगा दिंडोरा मुव्हमेंट तेलंगणाचे सरचिटणीस कृपागर मांदिगा, राज्य लोकसेवा आयोग कर्नाटकचे अध्यक्ष एच. आर. तेगनूर, वाल्मिकी महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष जी. एस. विश्नोर, मांझी समाज बिहारचे राष्ट्रीय अध्यक्ष जी. एस. प्रसाद, हरियाणातील सेवानिवृत्त आयएएस अधिकारी एम. एल. सरवान, अ. भा. सफाई मजदूर संघ दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष चरणसिंग टाक, वाल्मिकी समाज मध्य प्रदेशचे राजेश कटारे, गडमातंग समाज गुजरातचे मुलहिक श्रीमाली, होलार समाजाचे अ‍ॅड जावीर, मांगगारोडी समाजाचे अमर कसबे, खाटिक समाजाचे दिलीप ढोके यांची प्रमुख उपस्थिती होती. अरविंद डोंगरे यांनी आरक्षण असूनही अनुसूचित जातीतील घटकांना न्याय मिळाला नसल्याची खंत व्यक्त करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याची मागणी केली. एच. आर. तेगनुर म्हणाले, अनुसूचित जातीतील वंचित घटकांना न्याय देण्यासाठी जातींच्या लोकसंख्येनुसार त्यांचे वर्गीकरण करणे गरजेचे आहे. जयसिंग कछवा म्हणाले, घटनेने मागासवर्गीयांना आरक्षण दिले, परंतु शासनाने वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला नाही. अशा घटकांचे अ, ब, क, ड नुसार वर्गीकरण करून त्यांना धर्मांतरित अनुसूचित जातीतील घटकांप्रमाणे आरक्षण देण्याची मागणी केली. रामचंद्र दावलवार यांनी शिक्षणाकडे दुर्लक्ष केल्यामुळे आणि संघटित न झाल्यामुळे अनुसूचित जातीतील काही जाती अद्यापही मागास असल्याचे सांगितले. त्यासाठी आत्मपरीक्षण करून शिक्षणाकडे वळण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी अनुसूचित जातीतील वर्गीकरणाचा मसुदा तयार करून तो राष्ट्रपती, पंतप्रधान, विविध राज्यांचे राज्यपाल, पक्षांच्या नेत्यांना पाठविण्यात आला. संचालन प्रदीप बोरकर यांनी केले. आभार महादेव जाधव यांनी मानले. परिषदेला देशातील अनुसूचित जातीतील उपेक्षित घटकांचे विविध राज्यातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)