शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
2
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्कतव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
3
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
4
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
5
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
6
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
7
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश
8
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
9
Astrology: शनिदोष टाळण्यासाठी सगळ्याच राशीच्या लोकांनी आवर्जून 'अशी' घ्या काळजी!
10
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
11
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
12
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
13
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
14
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
15
Vastu Tips: लक्ष्मीविष्णुंना प्रिय असलेले कमळ घरात लावल्याने होणारे आर्थिक लाभ जाणून चकित व्हाल!
16
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
17
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
18
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
19
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
20
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र

‘महाज्योती’च्या पायलट ट्रेनिंगसाठी नॉनक्रीमी लेअरची अट कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2021 4:07 AM

संचालक मंडळाच्या बैठकीत झाला निर्णय आनंद इंगोले वर्धा: ‘महाज्योती’द्वारे देण्यात येणाऱ्या वैमानिकाच्या प्रशिक्षणासाठी नॉनक्रीमी लेअरची अट असतानाही, ही अट ...

संचालक मंडळाच्या बैठकीत झाला निर्णय

आनंद इंगोले

वर्धा: ‘महाज्योती’द्वारे देण्यात येणाऱ्या वैमानिकाच्या प्रशिक्षणासाठी नॉनक्रीमी लेअरची अट असतानाही, ही अट वगळण्यात आली होती. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करीत गरीब विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडली होती. यासंदर्भात सोमवारी पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत नॉनक्रीमी लेअरची अट कायम ठेवली आहे.

महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती)तर्फे ओबीसी व भटक्या विमुक्त जाती-जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी विविध योजना राबविण्यात येतात. या सर्व योजनांचा लाभ घेण्याकरिता विद्यार्थ्यांना नॉनक्रीमी लेअरची अट अनिवार्य केलेली आहे. महाज्योती २० विद्यार्थ्यांना वैमानिकाचे प्रशिक्षण देणार आहे. त्यासाठी २.५ कोटी रुपये फ्लाइंग क्लबला दिले आहेत. नागपूरचे विभागीय आयुक्त यांच्याकडे त्याची जबाबदारी दिली आहे. परंतु या योजनेसाठी नॉनक्रीमी लेअरची अट वगळण्यात आली असल्याचा आरोप विद्यार्थी संघटनांनी केला होता. शासकीय निधीतून श्रीमंतांच्या मुलांना प्रशिक्षण देण्यात येईल, अशी ओरड विद्यार्थ्यांची होती. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून ३१ मे रोजी होणाऱ्या बैठकीत निर्णयावर फेरविचार होण्याची गरज व्यक्त केली होती. सोमवारी महाज्योतीच्या कार्यालयात झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत इतर प्रशिक्षणाप्रमाणेच पायलट ट्रेनिंगकरिताही नॉनक्रीमी लेअरची अट कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

- ओबीसी, भटक्या जाती-जमाती व विशेष मागास प्रवर्गातील गरीब पाल्यांना उच्चशिक्षण मिळावे याकरिताच महाज्योतीची स्थापना करण्यात आली. याचा लाभ घेण्याकरिता विद्यार्थ्यांना नॉनक्रीमी लेअरची अट घालण्यात आली आहे; पण पायलट ट्रेनिंगकरिताच नॉनक्रीमी लेअरची अट वगळण्यात आली होती. त्यामुळे गरीब विद्यार्थ्यांच्या हक्कावर गदा येणार होती. संचालक मंडळाच्या बैठकीत विषय मांडण्यात आल्याने नॉनक्रीमी लेअरची अट कायम ठेवण्यात आली.

प्रा. दिवाकर गमे, संचालक महाज्योती

- २० विद्यार्थ्यांना बनविणार वैमानिक

महाज्योती २० विद्यार्थ्यांना वैमानिकाचे प्रशिक्षण देणार आहे. त्यासाठी फ्लाइंग क्लबला २.५ कोटी दिले आहेत. विभागीय आयुक्तांना त्याची जबाबदारी दिली आहे. या २० विद्यार्थ्यांमध्ये दोन विद्यार्थी शहिदाच्या कुटुंबातील, दोन विद्यार्थी शेतकरी आत्महत्या केलेल्या कुटुंबातील, व्हीजे-एनटीच्या चार विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

कोरोनामुळे महाज्योतीसाठी काम करण्यास वेळच मिळाला नाही

(निर्णयार्थ)

संचालक मंडळाच्या बैठकीत व्यक्त केली खंत

नागपूर : ऑगस्ट २०२०मध्ये ‘महाज्योती’च्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. याच महिन्यात संचालकांची निवड झाली. दोन महिने पदभरतीत गेले. डिसेंबरला कामाला सुरुवातच केली असताना कोरोना वाढला, लॉकडाऊन लागले. त्यामुळे महाज्योतीसाठी काम करण्यास वेळ मिळाला नाही. संचालकांच्या बैठकी होऊ शकल्या नाही. त्यामुळे योजना राबविता आल्या नाही, प्रशिक्षण घेता आले नाही, परिणामी निधीही खर्च झाला नाही, अशी खंत महाज्योतीचे अध्यक्ष व मदत व पुनर्वसन आणि बहुजन विकासमंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. महाज्योतीच्या संचालक मंडळाची तिसरी बैठक सोमवारी सामाजिक न्याय भवनात पार पडली. या बैठकीला वडेट्टीवार उपस्थित होते. बैठकीत प्राचार्य बबनराव तायवाडे, प्रा. दिवाकर गमे व लक्ष्मण वडले यांच्यासह व्यवस्थापकीय संचालक प्रदीप डांगे उपस्थित होते. पत्रकार परिषदेत त्यांनी महाज्योतीच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.

- ३५ कोटीच मिळाले महाज्योतीला

महाज्योतीला आतापर्यंत ३५ कोटी मिळाले आहेत. १५० कोटी रुपयांची तरतूद केली असून, अजूनही निधी मिळालेला नाही. ३५ कोटींपैकी ३.५ कोटी रुपये खर्च झाले आहे. मिळालेला निधी परत जाणार नाही, तो योग्यवेळी खर्च होईल, असे वडेट्टीवार म्हणाले.

- संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय

१) पीएच.डी.ची फेलोशिप ५०० विद्यार्थ्यांना देणार. २०१७ पासून नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांचा समावेश करणार. पाच वर्षासाठी २१ हजार रुपये विद्यावेतन देणार.

२) एम.फीलसाठी २०० विद्यार्थ्यांची निवड.

३) बँकिंग परीक्षेसाठी प्रशिक्षण.

४) भटक्या जातींच्या संशोधनासाठी दिल्लीच्या संस्थेला काम देणार.

५) यूपीएससीसाठी १००० व एमपीएससीसाठी २००० विद्यार्थ्यांना प्रशिक्षण.

६) कौशल्य विकास योजनेचा लाभ ४० हजार विद्यार्थ्यांना देणार.

७) पोलीस भरतीपूर्वी प्रशिक्षण व उच्चशिक्षणासाठी प्रवेशपूर्व परीक्षेच्या कोचिंगचे टार्गेट पूर्ण करणार.

८) शाळा-महाविद्यालयात महाज्योतीच्या योजनांचे फलक लावणार.

९) प्रत्येक जिल्ह्यात चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती करणार.

१०) शेतकऱ्यांसाठी तेल बियाणांचे क्लस्टर तयार करणार.

- ओबीसीच्या तीन विद्यार्थ्यांना घेतले ताब्यात

नागपूर : महाज्योतीकडून असलेल्या अपेक्षांची पूर्ती होऊ न शकल्याने मंत्र्यांना जाब विचारण्यासाठी औरंगाबाद विद्यापीठातून काही विद्यार्थी नागपुरात आले होते. या विद्यार्थ्यांना बजाजनगर पोलिसांनी ताब्यात घेतले. यामध्ये विठ्ठल नागरे, अंकुश राठोड व वाकोडे नावाच्या विद्यार्थ्यांच्या समावेश आहे.