शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

अविरत समाजसेवेचा ध्यास; उमेशबाबू चौबे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2018 10:45 AM

पीडित, वंचित, उपेक्षितांसाठी अवघे आयुष्य वेचणाऱ्या उमेशबाबूंना नागपुरात सगळेच आदराने बाबूजी म्हणतात.

ठळक मुद्देपीडित, वंचित, उपेक्षितांसाठी वाहिले अवघे आयुष्य

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: उत्तर प्रदेशातील यमुना किनारी असलेल्या होलीपुरा गावातून एक किशोरवयीन मुलगा नागपूरला निघाला होता. पुढच्या शिक्षणासाठी. वाटेत एका स्टेशनवर गाडी थांबली तेव्हा पाणपोईवर वो हिंदू का पाणी, वो मुसलमान का पाणी असे शब्द त्याने ऐकले आणि ते शब्द त्याच्या कानामनावर आदळत राहिले एखाद्या ज्वालारसाप्रमाणे. देवाने पाण्याची निर्मिती करताना कुठलाच भेदभाव केला नाही, मग माणसं हा भेद का जपताहेत? नाही... हे चित्र बदलले पाहिजे, असा ध्यास त्याने चालत्या गाडीतच घेतला आणि नागपुरात पाय ठेवल्यावर त्याच दिशेने चालण्याचा संकल्पही केला आणि जीवनाच्या शेवटपर्यंत तो पाळला. तो मुलगा म्हणजे ज्येष्ठ समाजसेवी उमेशबाबू चौबे होत.

काय आहे घटना ?स्वातंत्र्यपूर्व काळापासून नागपुरात झालेल्या ऐतिहासिक चळवळीचे प्रत्यक्षदर्शी, बदलत्या नागपूरला अनुभवणारे एक सुजाण पत्रकार आणि समाजसेवेचा आयुष्यभर वसा जपलेले एक ज्येष्ठ समाजसेवी, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष उमेशबाबू चौबे यांचे बुधवारी रात्री ११.३० वाजता अल्प आजाराने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते.  

खरी ओळख एका नि:स्वार्थ समाजसेवकाची

पीडित, वंचित, उपेक्षितांसाठी अवघे आयुष्य वेचणाऱ्या उमेशबाबूंना नागपुरात सगळेच आदराने बाबूजी म्हणतात. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राम मनोहर लोहिया यांना आपल्या आयुष्यात प्रत्यक्ष पाहिलेले व त्यांच्या विचारांना आपला आदर्श मानणारे बाबूजी अवघे आयुष्य एखाद्या अवलियासारखेच जगले. पत्रकार, छायाचित्रकार, समाजसेवक, नाटककार, राजकारणी अशा विविध भूमिकांमध्ये नागपूरवासीयांनी बाबूजींना पाहिले असले तरी त्यांची खरी ओळख एका नि:स्वार्थ समाजसेवकाची आहे. आॅटोचालक, रिक्षाचालक, रेल्वे हमाल, फुटपाथ दुकानदार, माथाडी कामगार, मिल मजूर यांच्या हक्कासाठी वेळोवेळी आंदोलनाची मूठ बांधून त्या आंदोलनाच्या बळावर अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्याचे कार्य उमेशबाबूंनी केले. त्यासाठी प्रसंगी घरावर तुळशीपत्र ठेवले. केवळ कष्टकरी मजुरांसाठीच संघटना बांधून ते थांबले नाहीत तर विदर्भातील कलावंतांना सन्मानाने व्यासपीठ मिळावे, यासाठी ३० वर्षाआधी त्यांनी स्वत: पुढाकार घेऊन कलासागर या संस्थेची स्थापना केली. तत्कालीन नागपूर विद्यापीठात अधिकृत विद्यार्थी संघटनेचे पहिले अध्यक्ष बनून विद्यार्थ्यांसाठी लढा दिला. नगरसेवक म्हणून मनपात प्रवेश केल्यावर अभ्यासपूर्ण पद्धतीने तेथील भ्रष्टाचार चव्हाट्यावर मांडला. धर्मातील दांभिकतेवर बोलताना एका कथित साधूने हल्ला केल्यानंतरही उमेशबाबू डगमगले नाहीत. उलट त्यांनी अशा भोंदूबाबांचा खरा चेहरा समाजासमोर आणण्यासाठी श्याम मानवांच्या नेतृत्वात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची नवी आघाडी उघडली. उमेशबाबूंमुळेच नागपूरच्या शंभर शहिदांचे स्मारक झिरो माईलजवळ उभारल्या गेले. असे समाजाला विधायक दिशा देणारे उमेशबाबू हे खऱ्या अर्थाने अजातशत्रू होते.

अंधश्रद्धा निर्मूलनात पाखंडी बुवाबाजांची पोलखोलअंधश्रद्धा विरोधात ढोंगी बुवाबाबा, मांत्रिक, तांत्रिक, ज्योतिष, भगत यांच्याकडून होणाऱ्या सर्वसामान्य जनतेच्या शोषणाविरुद्ध लहानपणापासून त्यांच्या मनात चीड निर्माण झाली होती. त्यांनी अनेकांचे पितळ उघडे करून भंडाफोड केला आहे. कृपालू महाराज, आसाराम बापू, शकुंतलादेवी, निर्मलबाबा, कलंकी भगवान, राधे माता, खटियावाले बाबा, गुलाबबाबा, चंगाई सभा (विदेशी पाद्री) कामठी येथील मस्जिदीत होणाऱ्या दैवी चमत्काराचे पितळ उघडे केले.

टॅग्स :Socialसामाजिक