शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

उत्तर नागपुरात गुन्हेगारांची दहशत

By admin | Published: April 13, 2016 3:08 AM

पोलिसांनी नेभळट भूमिका स्वीकारल्यामुळे उत्तर नागपुरात सध्या गुन्हेगार सोकावले आहेत.

पोलिसांची नेभळट भूमिका : सर्वसामान्य त्रस्त नागपूर : पोलिसांनी नेभळट भूमिका स्वीकारल्यामुळे उत्तर नागपुरात सध्या गुन्हेगार सोकावले आहेत. परिणामी सर्वसामान्य नागरिक दहशतीत आहेत. महिलांना मारहाण, विनयभंग, खंडणी वसुली असे प्रकार सर्रास सुरू आहेत. जरीपटक्यातील बाजारात सोमवारी सायंकाळी एका महिलेला गुन्हेगारी वृत्तीच्या तरुणांनी छेडण्याचा प्रयत्न केला. महिलेने चप्पल काढल्यानंतर आरोपींनी तिला अश्लील शिवीगाळ करीत पळ काढला. भाजीबाजार तसेच रस्त्यावर छोटी छोटी दुकाने थाटून आपला उदरनिर्वाह चालविणाऱ्यांकडून या घटनेतील आरोपींचे टोळके खंडणी वसुली करते. पोलिसांशी मैत्री असल्यामुळे तक्रार करूनही त्यांच्यावर कारवाई होत नाही. उलट तक्रार केल्याची माहिती पोलिसांकडून मिळत असल्याने, आरोपींचे टोळके नंतर पीडिताला वेठीस धरतात. तक्रारदाराकडून प्रकरण रेटून धरल्यास जुजबी कारवाई करून आरोपीला लगेच मोकळे केले जाते. त्यामुळे या गुन्हेगारांविरुद्ध पुन्हा कुणी आवाज काढण्याची हिंमत दाखवत नाही. शुक्रवारी रात्री जरीपटक्यात महेश अंडरसहारे आणि त्याची पत्नी ममता या दोघांनी ५० वर्षीय महिलेला तिच्या घरात शिरून बेदम मारहाण केली. तिचे कपडे फाटेपर्यंत आरोपींनी तिला अपमानीत केले. जरीपटका पोलिसांनी गुन्हे तर दाखल केले, मात्र आरोपी अंडरसहारेला पाहुण्यासारखी वागणूक दिल्यामुळे खुद्द पोलीस ठाण्यातीलच काही कर्मचाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पाचपावलीतील आठवडी बाजारात वर्गणीच्या नावाखाली खंडणी वसूल करणाऱ्या मनोज बन्सोडच्याही पोलिसांनी अद्याप मुसक्या बांधल्या नाही. एका महिलेवर अत्याचार करणारा कुख्यात गुंडही मोकाटच आहे.(प्रतिनिधी)