लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अध्यात्मात विज्ञान सामावलेले आहे. विज्ञानात आपण अध्यात्माचा शोध घेऊ शकत नाही. परंतु अध्यात्मात विज्ञानाचा शोध घेता येतो असे सांगून ईश्वरापेक्षा कोणताच वैज्ञानिक मोठा नाही, असे मार्गदर्शन श्री ऋगवैदिय पूर्वाम्नाय गोवर्धन मठ पुरी पीठाचे १४५ वे श्रीमद्जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री निश्चलानंद सरस्वती महाराज यांनी केले.श्री ऋगवैदिय पूर्वाम्नाय गोवर्धन मठ पुरी पीठाचे १४५ वे श्रीमद्जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री निश्चलानंद सरस्वती महाराजांचे शनिवारी नागपुरात आगमन झाले. हिवरीनगरच्या श्री बडी मारवाड माहेश्वरी भवनात त्याच्या दर्शनाचा, प्रवचनाचा लाभ भाविकांनी घेतला. स्वामी निश्चलानंद सरस्वती महाराज म्हणाले, विज्ञानाच्या मान्यता अस्थिर आहेत. वेदविरहित विज्ञानाला क्रियान्वित केल्यामुळे जगात विस्फोटाची स्थिती निर्माण झाली आहे. केवळ ऊँ आणि रामाची व्याख्या केली तर त्यात संपूर्ण ब्रह्मांड सामावलेले आहे. भारतीय शिक्षण पद्धतीवर ते म्हणाले, ही पद्धती साम्यवाद आणि विदेश तंत्रज्ञानाच्या आधारे तयार करण्यात आली आहे. परंतु भारतीय शिक्षण पद्धती कितीतरी पटीने मोठी आहे. परंपरेने शास्त्रांचे ज्ञान मिळविणे आवश्यक आहे. भारताचे पौराणिक नाव आणि इतर नावांबाबत त्यांनी विस्ताराने माहिती दिली. सोबतच भारताला भारत म्हटल्यास वावगे नसल्याचे त्यांनी सांगितले. स्वामीजींच्या आगमनाप्रसंगी त्यांचे स्वागत आणि वंदन करण्यात आले. त्यांच्या चरणपादुकांचे पूजन अरुण लखानी यांनी केले. पादुका दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी महाराष्ट्राचे परिवहन मंत्री दिवाकर रावते, पुरुषोत्तम मालू, राधेशाम सारडा, महेश पुरोहित, मनोज बियाणी, राजेंद्र चांडक उपस्थित होते.सद्भाव स्थापन करण्याची गरजस्वामी शंकराचार्य सरस्वती महाराज म्हणाले, संवादाच्या माध्यमातून संवाद स्थापन करण्याची गरज आहे. आजचा काळ संक्रमणाचा आहे. सनातन मार्गावर वाटचाल करण्यासाठी लोक असमर्थ आहेत. वर्णव्यवस्था योग्य असल्याचे सांगत त्यांनी ती आवश्यक असल्याचे सांगितले. ते म्हणाले, सर्वांच्या मर्यादा असतात. त्यांचे पालन केल्यामुळेच आपल्याला हव्या त्या ठिकाणी पोहचता येते. पूर्वीच्या जन्मात चांगले कर्म केले नसल्यास त्याचा परिणाम या जन्मावर पडतो. परंतु धर्म आणि ईश्वराच्या भक्तीने आपण ते अनुकूल करु शकतो. वाल्मिकी रामायण आणि गीतेत त्याचा उल्लेख आहे.
ईश्वरापेक्षा मोठा वैज्ञानिक नाही : शंकराचार्य स्वामी श्री निश्चलानंद सरस्वती महाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 12:32 AM
अध्यात्मात विज्ञान सामावलेले आहे. विज्ञानात आपण अध्यात्माचा शोध घेऊ शकत नाही. परंतु अध्यात्मात विज्ञानाचा शोध घेता येतो असे सांगून ईश्वरापेक्षा कोणताच वैज्ञानिक मोठा नाही, असे मार्गदर्शन श्री ऋगवैदिय पूर्वाम्नाय गोवर्धन मठ पुरी पीठाचे १४५ वे श्रीमद्जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री निश्चलानंद सरस्वती महाराज यांनी केले.
ठळक मुद्देश्री ऋगवैदिय पूर्वाम्नाय गोवर्धन मठपुरी पीठाचे १४५ वे श्रीमद्जगद्गुरु