शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
2
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
3
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींची हवा संपली, रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”
4
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
5
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
6
शेअर बाजारातील घसणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल 
7
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
8
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
9
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
11
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
12
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
13
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
14
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
15
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
16
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
17
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
18
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
19
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब

शेतकरी नव्हे केवळ एक कुटुंबच मजबूत झाले : राधामोहन सिंह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 10:36 PM

‘अ‍ॅग्रोव्हिजन’ कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह कृषी विकास व तंत्रज्ञान यांच्यावर भाष्य करतील, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात त्यांनी राजकीय स्वरूपाच्या भाषणावरच जास्त भर दिला. स्वातंत्र्यानंतर आपल्या देशातील शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले. शेतकऱ्यांऐवजी केवळ एक कुटुंबच मजबूत झाले, असा आरोप करत अप्रत्यक्षपणे काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. 

ठळक मुद्देआघाडी व संपुआ सरकारवर जोरदार टीकास्त्र

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ‘अ‍ॅग्रोव्हिजन’ कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह कृषी विकास व तंत्रज्ञान यांच्यावर भाष्य करतील, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात त्यांनी राजकीय स्वरूपाच्या भाषणावरच जास्त भर दिला. स्वातंत्र्यानंतर आपल्या देशातील शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले. शेतकऱ्यांऐवजी केवळ एक कुटुंबच मजबूत झाले, असा आरोप करत अप्रत्यक्षपणे काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. 

विदर्भाचा भाग हा शेतकरी आत्महत्यांसाठीच चर्चेत होता. मात्र शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करून केवळ एकाच कुटुंबाला मजबूत करण्याचे प्रयत्न झाले. जर काही चांगले काम केले असते, तर शेतकरी आत्महत्या झाल्या नसत्या. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींवर २००७ मध्येच अंमलबजावणी व्हायला हवी होती. मात्र तसे झाले नाही. आता मोदी सरकार त्याला लागू करत आहे, तेव्हा विरोधकांना शेतकरी आठवत आहेत. देशाचे राजकुमार मागील १० वर्षांपासून कुठल्या खाटेवर झोपले होते, असा प्रश्न उपस्थित करत संपुआ शासनाने लक्ष न दिल्याने शेतकऱ्यांची दुरवस्था झाली असल्याचा आरोप त्यांनी लावला. विरोधक नोटाबंदीमुळे शेतकरी अडचणीत आल्याचे आरोप करत आहेत. मात्र नोटाबंदीमुळे शेतकऱ्यांना कुठलीही समस्या निर्माण झाली नाही. प्रत्यक्षात नोटाबंदीमुळे बँकांमध्ये पैशांचा ओघ वाढला व शेतकरी हिताच्या विविध योजनांची मजबूतपणे अंमलबजावणी झाली. नोटाबंदीमुळे काही विशिष्ट लोकांचे नुकसान नक्कीच झाले व ते आज जामिनावर फिरत आहेत, असा टोला त्यांनी मारला. संपुआ सरकारच्या काळापेक्षा कृषीक्षेत्रातील अर्थसंकल्पीय तरतूद मोठ्या प्रमाणात वाढली आहे. महाराष्ट्रात फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने अनेक सकारात्मक पावले उचलली आहेत. नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाचा आम्हाला नेहमीच फायदा होतो व त्यांचे ‘व्हिजन’ नवी दिशा दाखविणारे असते, असेदेखील राधामोहन सिंह म्हणाले. 
मराठवाड्यातील मुख्यमंत्र्यांनी काय केले ?काही वर्षांअगोदर लातूरमध्ये अक्षरश: रेल्वेगाड्यांतून पिण्याचे पाणी आणण्यात आले होते. आश्चर्याची बाब म्हणजे लातूर व आजूबाजूच्या परिसराने महाराष्ट्राला चार मुख्यमंत्री दिले. मात्र त्यांनी एक विशिष्ट कुटुंब, पक्ष आणि स्वत:च्याच फायद्यावर भर दिला. जलसंवर्धनाकडे दुर्लक्षच केले. परिणामी चार मुख्यमंत्री देऊनदेखील लातूरच्या नशिबी अशी स्थिती आली, अशी टीका राधामोहन सिंह यांनी केली.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी