शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
2
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
3
'सत्ते'पुढे शहाणपण नाही! सरकार वाचवण्यासाठी PM नेतन्याहू मान्य करणार हमासच्या अटी?
4
मतदान केंद्रावरील मोबाइलबंदी योग्यच; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
5
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
6
लेकीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं पण स्वामींनी तारलं! सविता मालपेकर यांनी सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग
7
नाशिकमध्ये येऊन गेले सर्वपक्षीय दिग्गज नेते; राष्ट्रीय नेतृत्वापासून सर्वोच्च नेत्यांच्या प्रचारसभा
8
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
9
भाजपची मोठी कारवाई; माजी नगरसेवकांसह १६ जणांची भाजपकडून हकालपट्टी
10
NTPC Green Energy IPO: आजपासून ₹१०००० कोटींचा IPO गुंतवणूकीसाठी खुला, काय करावं? एक्सपर्ट म्हणाले...
11
ज्या नगरसेवकाच्या वॉर्डात कमी मते, त्याचे तिकीट कापू; एकनाथ शिंदे यांचा इशारा
12
गाजरांमुळे अमेरिकेत भीतीचं वातावरण! सर्व स्टोअरवरून परत मागवले; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
13
दिल्लीत विषारी धुके, ट्रकला प्रवेशबंदी, प्रकल्पांची कामेही स्थगित
14
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
15
सलमानसमोर बोलती बंद, आता Bigg Boss 18 मधून बाहेर आल्यावर अश्नीर ग्रोव्हर काय म्हणाला?
16
IPL 2025 Mega Auction : या ३ भारतीय अष्टपैलू खेळाडूंवर लागू शकते मोठी बोली
17
जो बायडेन यांना तिसरं महायुद्ध हवंय का? 'या' निर्णयावर ट्रम्प यांच्या मुलाने उपस्थित केला प्रश्न...
18
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
19
गुजरातेत रॅगिंगने घेतला एकाचा बळी; साडेतीन तास उभे राहण्याची केली सक्ती
20
Pakistan Latest News पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'

‘नोटा’ म्हणजे निराशेच्या सुराचे प्रतिबिंब :मोहन भागवत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 11:29 PM

समाजात सर्वच वाईट सुरू आहे असे अनेकांना वाटते, कारण त्यांची चांगले बघण्याची दृष्टी कमकुवत असते. आजही समाजात ४० टक्के सत्कार्य आहे. पण हल्ली देशात नकारात्मक गोष्टी मोठ्या प्रमाणात प्रसारित व प्रकाशित होतात. पण वस्तुस्थिती फार वेगळी असते. निवडणुकीतील ‘नोटा’ म्हणजे समाजातील निराशेच्या सुरांचे प्रतिबिंब असल्याचे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.

ठळक मुद्देलोकमाता पुरस्कार वितरण सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : समाजात सर्वच वाईट सुरू आहे असे अनेकांना वाटते, कारण त्यांची चांगले बघण्याची दृष्टी कमकुवत असते. आजही समाजात ४० टक्के सत्कार्य आहे. पण हल्ली देशात नकारात्मक गोष्टी मोठ्या प्रमाणात प्रसारित व प्रकाशित होतात. पण वस्तुस्थिती फार वेगळी असते. निवडणुकीतील ‘नोटा’ म्हणजे समाजातील निराशेच्या सुरांचे प्रतिबिंब असल्याचे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.लोकमाता सुमतीताई स्मृती प्रतिष्ठानच्या पुरस्कार वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. सोमवारी सायंटिफिक सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. उदय बोधनकर, सचिव ज्योत्स्ना पंडित, माजी महापौर कुंदा विजयकर, डॉ. प्रवीण गादेवार, छाया गाढे, देवेंद्र दस्तुरे, राजू मोरोणे, सुधीर कुणावार उपस्थित होते. यावेळी मोहन भागवत यांच्या हस्ते पद्मश्री राणी बंग यांना लोकमाता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर लोकमाता स्वयंसेवी संस्थेचा पुरस्कार ‘सक्षम’ या संस्थेस प्रदान करण्यात आला. लोकमाता विशेष सेवा पुरस्काराने चंद्रपूरचे वन परिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे व लेखक अनंत ढोले यांना पुरस्कृत करण्यात आले.यावेळी सरसंघचालक म्हणाले की, परदेशात धनाढ्य व राजपुरुषांची चरित्रे साकारली जातात. तर भारतात पित्याच्या आज्ञेने १४ वर्षांचा वनवास सहर्ष स्वीकारणाऱ्या मर्यादा पुरुषोत्तमाचे चरित्र वर्षानुवर्षे अनुसरले जाते. असे असले तरी समाजात बरेचदा निराशेचे सूर उमटताना दिसतात. निवडणुकीतील ‘नोटा’ हे त्याचेच प्रतीक आहे. परंतु, याचा अर्थ समाजात काहीच चांगले घडत नाही असे नव्हे. संघकायार्साठी आपला देशभर प्रवास होतो. त्यातून बºयाच गोष्टींचा बोध होतो. समाजात जेवढी नकारात्मकता प्रसारित किंवा प्रकाशित होते त्याहून ४० टक्के अधिक चांगल्या गोष्टी घडतातहेत. समाज, देश आणि जग यात सत्तेमुळे नव्हे तर लोकशक्तीने परिवर्तन होत असते. त्यासाठी प्रत्येकामध्ये कर्तव्यबुद्धीसोबतच जिव्हाळा असणे आवश्यक आहे. माणसाने एकांतात आत्मसाधना आणि लोकांतात परोपकार केला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन वृषाली देशपांडे यांनी केले. आभार डॉ. प्रवीण गादेवार यांनी मानले. 

आई म्हणाली होती तू नापास व्हायला पाहिजेलोकमाता पुरस्कार स्वीकारल्यानंतर डॉ. राणी बंग म्हणाल्या की, हा पुरस्कार माझ्या माहेरच्यांकडून मिळत असल्याने मी भाग्यवान समजते. त्या आपल्या आईसंदर्भात बोलताना म्हणाल्या की, वैद्यकीय क्षेत्रात एमडी करीत असताना आई म्हणाली महिलांना प्रसूतीच्या काळात महिलांना खूप त्रास सहन करावा लागतो, त्यामुळे प्रसूतीच्या वेळी त्यांच्याशी आपुलकीने वाग, नाही तर एमडी करू नको, साधे एमबीबीएस पुरे आहे. ती अशीही म्हणाली की, राणी तू नापास झाली पाहिजे. कारण जीवन म्हणजे रेड कार्पेट नाही. आईचे हे बोल आजही माझ्या लक्षात आहे.हुशार आणि गरजवंतांना सदैव मदत करणारपुरस्काराला उत्तर देताना वन परिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे म्हणाले की, अतिशय खडतर परिस्थितीतून मी शिक्षण घेतले आणि मोठा झालो. माझ्यात प्रतिभा होती, साथ कुणाची नव्हती. त्यावेळी मिळालेल्या काही चांगल्या लोकांमुळे आज मी खंबीरपणे उभा आहे. तेव्हा मिळालेल्या सहकार्याची जाणीव असल्यामुळे हुशार आणि गरजवंत विद्यार्थ्यांना मी मदत करीत आहे आणि सदैव करीत राहणार आहे.सरसंघचालक म्हणजे संघ नाहीया पुरस्कार समारंभात सरसंघचालकांना मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी मानपत्रातून त्यांच्यावर शब्दसुमनांची उधळण करण्यात आली. पण मानपत्राच्या संदर्भाने बोलताना ते म्हणाले की, सरसंघचालक म्हणजे संघ नसून संघ या शब्दात सर्वसमावेशक सामूहिकता आहे. सरसंघचालक हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा केवळ चेहरा आहे. मी काही तरी वेगळा आहे असा गैरसमज मी करून घेत नाही. समाज, देश याची काळजी करणारे असंख्य लोक संघात आहेत. सरसंघचालक केवळ त्यांच्यासोबत वाटचाल करीत असतात.

 

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ