शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एकाच वाक्यात सांगितलं
3
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
4
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
5
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
6
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
7
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
8
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
9
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
10
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
11
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
13
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
15
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
16
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
17
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
18
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
19
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
20
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका

मेट्रो रिजनमधील १४६८ अनधिकृत इमारतींना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 12:17 AM

नागपूर मेट्रो रिजनमधील १४६८ अनधिकृत इमारतींना नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एनएमआरडीए) महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ५३ खाली नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत उपस्थित एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.

ठळक मुद्देविधानसभा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर मेट्रो रिजनमधील १४६८ अनधिकृत इमारतींना नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एनएमआरडीए) महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ५३ खाली नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत उपस्थित एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आदींनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. त्याच्या लेखी उत्तरात मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की,अनधिकृत बांधकाम नोटीसच्या अनुषंगाने अर्जदारांना कलम ४४ अन्वये नियोजन प्राधिकरणाकडे बांधकाम नियमानुकूल करण्याबाबतचा प्रस्ताव दाखल करता येऊ शकतो. म्हणून नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये ३१ डिसेंबर २०१५ च्या पूर्वी विना मंजुरीची भूखंड अभिन्यास बांधकामे ‘प्रशमन संरचना’ म्हणून घोषित करण्यासाठी अर्ज स्वीकारण्याची मुदत ३१ आॅक्टोबर २०१८ पर्यंत आहे. नोटीस देण्यात आलेल्या एकूण ३१० भूखंडधारकांनी एनएमआरडीएकडे प्रस्ताव सादर केले आहेत. हे प्रस्ताव छाननी प्रक्रियेत आहेत. मुदतवाढ दिल्यानंतर अर्ज स्वीकारणे सुरू आहे. आतापर्यंत प्रशमित संरचनाअंतर्गत एकूण ३,८९५ अर्ज नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे प्राप्त झाले आहेत, असेही त्यांनी लेखी उत्तरात स्पष्ट केले.खापा नगर परिषदेत एलईडी लाईटच्या कामात गैरव्यवहारनागपूर जिल्ह्यातील खापा नगर परिषदेतील प्रभाग क्रमांक २ येथे विद्युत खांबांवर एलईडी लाईट लावण्याच्या कामात गैरव्यवहार झाल्याची बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत उपस्थित एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात मान्य केली.१४ व्या वित्त आयोगाच्या निधीमधून एलईडी लाईटसाठी १४ लाख २३ हजार ८९० रुपये इतका निधी मंजूर झाला होता. निविदा काढून वरद असोसिएट यांच्याशी करारनामा करण्यात आला होता. २०१७ मध्ये या कामात गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी नगरसेवकांनी केल्या. शासकीय तंत्रनिकेतन यांच्याकडून तांत्रिक लेखापरीक्षण करण्यात आले. त्यामध्ये क्लॅम्प ६ मि.मी.ऐवजी ३ ते ४ मि.मी. बसविल्याचे नमूद केल्याने क्लॅम्पची किंमत ५० टक्के कमी करून उर्वरित रक्कम कंत्राटदाराला प्रदान करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत या तक्रारीची चौकशी सुरू असून, चौकशी पूर्ण होईपर्यंत कंत्राटदारास सुरक्षा अनामत क्कम प्रदान न करण्याचा निर्णय नगर परिषदेने घेतला असल्याचे त्यांनी लेखी उत्तरात सांगितले.

टॅग्स :Nagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस