नागपूर : खंडपीठाने सहायक शिक्षकाच्या बडतर्फीशी संबंधित पुनर्विचार प्रकरणामध्ये शालेय शिक्षण सचिव, शिक्षण संचालक, शिक्षण उपसंचालक, जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी, नागसेन शिक्षण संस्था व नागसेन विद्यालय या प्रतिवादींना नोटिसा बजावल्या आहेत. न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व अरुण उपाध्ये यांच्यासमक्ष प्रकरणावर सुनावणी झाली.अनमोल गोस्वामी असे सहायक शिक्षकाचे नाव असून ते बेझनबाग येथील नागसेन विद्यालयात कार्यरत होते. शाळा व्यवस्थापनाने १४ मे २०१५ रोजी आदेश जारी करून गोस्वामी यांना बडतर्फ केले. त्याविरुद्ध त्यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. न्यायालयाने २ मे रोजी त्यांची याचिका खारीज केली. गोस्वामी यांनी त्या निर्णयावर आक्षेप घेऊन न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे.
सहायक शिक्षकाच्या बडतर्फीचे प्रकरण, शालेय शिक्षण सचिवांना नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 5:40 AM