शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
4
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
5
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
6
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
7
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
8
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
9
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
10
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
11
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
12
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
13
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
14
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
15
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
16
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
17
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
18
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
19
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
20
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."

मनपाची जागा नसतानाही नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2017 12:31 AM

वाठोडा व तरोडी भागात वास्तव्यास असलेल्या अनेक खसºयातील नागरिकांना राहती घरे व प्लॉट जागा खाली करण्याच्या नोटिसा महापालिकेने बजावल्या आहेत.

ठळक मुद्देकारवाईच अवैध : वाठोडा येथील भूखंडधारकांचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वाठोडा व तरोडी भागात वास्तव्यास असलेल्या अनेक खसºयातील नागरिकांना राहती घरे व प्लॉट जागा खाली करण्याच्या नोटिसा महापालिकेने बजावल्या आहेत. जागेचा ताबा न सोडल्यास पोलिसांच्या व अतिक्रमण विभागाच्या मदतीने घरे पाडण्याचा इशारा देण्यात आला आहे. यात वाठोडा येथील भूमापन क्र मांक १७८/१ मधील ०.७४ हेक्टर जागा ही महापालिकेच्या मालकीची नाही. मालकी हक्काबाबत शहानिशा न करताच येथील भूखंडधारकांनाही महापालिकेने नोटिसा बजावल्याचा आरोप भूखंडधारकांनी केला आहे.माँ शुभलक्ष्मी लॅन्ड डेव्हलपर्स यांच्याकडून ७८ लोकांनी १० वर्षांपूर्वी भूखंड विकत घेतले आहेत. या भूखंडधारकांना २०१२ मध्ये महापालिकेने नोटिसा बजावल्या होत्या. याविरोधात भूखंडधारकांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयात महापालिका मालकी हक्काबाबतची कागदपत्रे सादर क रू न शकल्याने न्यायालयाने या प्रकरणातून महापालिकेचे नाव वगळण्याचा निर्णय दिला होता. न्यायालयाच्या निर्णयाविरोधात महापालिकेने अपील केले नव्हते, म्हणजेच ही जागा महापालिकेच्या मालकीची नव्हती, अशी माहिती अ‍ॅड. यशवंत मेश्राम यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.जमिनीच्या सातबारावर शशिकला परतेकी, सुनीता रेवतकर, मारोती तडस, बनाबाई तडस, ज्ञानेश्वर तडस, सुनीता तडस, प्रीती व कुंदा मुरलीधर तडस आदींची नावे आहेत. परंतु वाठोडा व तरोडी भागातील भूखंडधारकांना सरसकट जागा खाली करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. दुसरीकडे काही महिन्यांपूर्वी येथील भूखंडधारकांना महापालिकेने मालमत्ता कर आकारणीची देयके पाठविलेली आहेत.जी जागा महापालिकेच्या मालकीची नाही अशा जागेवरील भूखंडधारकांना नोटिसा बजावल्याने नागरिकांत दहशत पसरली आहे. येथे बहुसंख्य लोकांनी घरे बांधलेली आहेत तर काही भूखंड खाली आहेत. वाठोडा परिसरात कौशल्य विकास केंद्र व क्र ीडा संकुल उभारण्यासाठी या भागातील नागरिकांना महापालिकेने २४ तासात घरे पाडून जागा खाली करण्याचे निर्देश दिले आहे. परंतु भूमापन क्रमांक १७८/१ हा महापालिकेच्या मालकीचा नाही तसेच या जागेवर त्यांचा ताबाही नाही. असे असतानाही नोटिसा बजावलेल्या आहेत. यात न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी महापालिका अधिकाºयांना न्यायालयामार्फत नोटीस बजावणार असल्याची माहिती मेश्राम यांनी दिली. पत्रकार परिषदेला आशिष खेडकर, राजू देशभ्रतार, बंडू बोरकर, मोरेश्वर मेश्राम, सुगराम गोडघाटे आदी उपस्थित होते.नागरिकांत दहशतमहापालिकेने २०१२ मध्ये या भागातील लोकांना नोटीस बजावून जागेची कागदपत्रे सादर करण्यास सांगितले होते. त्यांनी जागा खरेदी केल्याबाबतची कागपत्रे सादर केली होती. त्यानंतर ही कारवाई थंडबस्त्यात पडली होती. दोन दिवसापूर्वी महापालिकेने या भागातील ३५० घरमालक व १५० झोपडपट्टीधारकांना पुन्हा नोटीस बजावून जागा खाली करण्याचे निर्देश दिले आहे. पक्की घरे पाडण्यात येणार असल्याचा इशारा दिल्याने नागरिकांत दहशत आहे.