लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सिहोरा, ता. तुमसर येथील महाराष्ट्र विद्यालयाच्या व्यवस्थापनासंदर्भातील प्रकरणात शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीचे सचिव शेषराव खाडे यांना अवमानना नोटीस बजावली.खाडे यांच्याविरुद्ध महाराष्ट्र शिवाजी शिक्षण संस्था सिहोराचे उपाध्यक्ष राजीवकुमार दलाल व सचिव संजीव दलाल यांनी अवमानना याचिका दाखल केली आहे. यापूर्वी त्यांनी रिट याचिका दाखल करून महाराष्ट्र विद्यालयाच्या व्यवस्थापनावर दावा सांगितला होता. १७ एप्रिल २०१८ रोजी उच्च न्यायालयाने या प्रकरणातील तथ्यांसंदर्भात विविध वाद असल्याची बाब लक्षात घेता, ती याचिका निकाली काढून याचिकाकर्त्यांना कायद्यात उपलब्ध अन्य मार्गाचा अवलंब करण्याची मुभा दिली होती. असे असताना खाडे यांनीशिक्षणाधिकाऱ्यांसह अन्य विविध प्राधिकाऱ्यांना पत्र लिहून, महाराष्ट्र विद्यालय हे शिवाजी शिक्षण संस्थेचे असल्याचा व उच्च न्यायालयातील याचिका मागे घेण्यात आल्याचा खोटा प्रचार केला. त्यामुळे न्यायालयाचा अवमान झाला, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व श्रीराम मोडक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने खाडे यांना अवमानना नोटीस बजावून, यावर २५ फेब्रुवारीपर्यंत उत्तर दाखल करण्यास सांगितले. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. सी. एस. धाबे व अॅड. व्ही. ए. धाबे यांनी कामकाज पाहिले.
शिवाजी शिक्षण संस्था सचिवांना अवमानना नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 8:38 PM
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सिहोरा, ता. तुमसर येथील महाराष्ट्र विद्यालयाच्या व्यवस्थापनासंदर्भातील प्रकरणात शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीचे सचिव शेषराव खाडे यांना अवमानना नोटीस बजावली.
ठळक मुद्देहायकोर्ट : शाळा व्यवस्थापनाचा वाद