हायकोर्ट : संजय धोत्रे, बाळू धानोरकर यांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 09:09 PM2019-07-24T21:09:28+5:302019-07-24T21:13:03+5:30

अकोला येथील भारतीय जनता पार्टीचे खासदार संजय धोत्रे यांच्याविरुद्ध मतदार ज्ञानेश्वर सुलताने यांनी तर, चंद्रपूर येथील काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांच्याविरुद्ध वंचित बहुजन आघाडीचे राजेंद्र महाडोले यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात निवडणूक याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती मनीष पितळे यांनी बुधवारी या प्रकरणात धोत्रे व धानोरकर यांना नोटीस बजावून ३० ऑगस्टपर्यंत उत्तर सादर करण्यास सांगितले.

Notice to Sanjay Dhotre, Balu Dhanorkar | हायकोर्ट : संजय धोत्रे, बाळू धानोरकर यांना नोटीस

हायकोर्ट : संजय धोत्रे, बाळू धानोरकर यांना नोटीस

googlenewsNext
ठळक मुद्देलोकसभा निवडणुकीला आव्हान

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : अकोला येथील भारतीय जनता पार्टीचे खासदार संजय धोत्रे यांच्याविरुद्ध मतदार ज्ञानेश्वर सुलताने यांनी तर, चंद्रपूर येथील काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांच्याविरुद्ध वंचित बहुजन आघाडीचे राजेंद्र महाडोले यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात निवडणूक याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती मनीष पितळे यांनी बुधवारी या प्रकरणात धोत्रे व धानोरकर यांना नोटीस बजावून ३० ऑगस्टपर्यंत उत्तर सादर करण्यास सांगितले.
लोकसभेच्या अकोला व चंद्रपूर मतदार संघातील निवडणुकीत दोषपूर्ण ईव्हीएम वापरण्यात आल्या. त्यामुळे झालेले मतदान व मोजण्यात आलेले मतदान यात फरक आढळून आला. त्याचा फायदा विजयी उमेदवारांना मिळाला. तसेच, निवडणूक अधिकाऱ्यांनी निवडणूक कायद्यातील तरतुदी व नियमांचे काटेकोर पालन केले नाही. त्यामुळे दोन्ही मतदार संघातील निवडणूक रद्द करून त्या ठिकाणी नव्याने निवडणूक घेण्यात यावी असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. निहालसिंग राठोड यांनी कामकाज पाहिले.

Web Title: Notice to Sanjay Dhotre, Balu Dhanorkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.