शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
2
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
3
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
4
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
5
"एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना माहीत आहे की..."; महायुतीच्या CM पदाच्या चेहऱ्यावरून ओवेसींचं मोठं विधान
6
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
7
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
8
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
9
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
10
उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
11
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
13
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
14
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेषाद्रीने सांगितली आठवण
15
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
16
Maharashtra Election 2024 Live Updates: ‘आम्ही हे करू’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरे म्हणाले...
17
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
18
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
19
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
20
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका

कुख्यात बिल्डर मुकेश झाम याला पत्नीसह अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 12:18 AM

शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणारा कुख्यात बिल्डर मुकेश झाम आणि त्याची पत्नी पुनम झाम या दोघांच्या नागपूर पोलिसांनी पुण्यात जाऊन मुसक्या बांधल्या.

ठळक मुद्देमोठी रोकडही सापडली : नागपूर पोलिसांची पुण्यात कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणारा कुख्यात बिल्डर मुकेश झाम आणि त्याची पत्नी पुनम झाम या दोघांच्या नागपूर पोलिसांनी पुण्यात जाऊन मुसक्या बांधल्या. त्यांना घेऊन पोलीस पथक नागपूरकडे निघाले असून, शुक्रवारी दुपारपर्यंत ते नागपुरात पोहचणार आहे.आरोपी मुकेश झाम आणि त्याच्या पत्नीवर फसवणुकीचे दोन गुन्हे आहेत. त्यातील एक नवोदय बँकेच्या घोटाळ्याचा तर दुसरा गृह प्रकल्पाच्या नावाखाली शेकडो जणांचे कोट्यवधी रुपये हडपण्याचा आहे. आरोपी हेमंत झामचा मुकेश झाम काका होय. हेमंत, मुकेश आणि त्याचे काही नातेवाईक आणि साथीदार यांनी कन्हैय्या सिटीच्या नावाखाली बंगलो, फ्लॅट स्वस्त दरात देण्याची थाप मारून शेकडो लोकांना गंडविले. अनेकांची आयुष्यभराची रक्कम गिळंकृत करून त्यांना पैशासाठी मोताद करणाऱ्या आरोपींनी नागपुरातून पळ काढल्यानंतर पीडितांच्या पैशावर ऐशोरामात जगणे सुरू केले. पोलीस त्यांचा जागोजागी शोध घेत होते. मात्र, ते पोलिसांनाच काय, न्यायालयाच्या वॉरंटलाही दाद देत नव्हते. पोलिसांच्या लेखी फरार असलेला हेमंत झाम दोन कोटींच्या आलिशान सदनिकेत सोनेगावात ऐशोरामात राहत होता. अनेकांची आर्थिक कोंडी करून त्यांना रस्त्यावर आणणारे आरोपी झाम आणि त्याचे साथीदार पोलिसांना कसे काय सापडत नाही, असा सवाल करून पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी त्यांना तातडीने शोधून काढण्याचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर, गुन्हे शाखेच्या युनिट एक मधील पथकाने हेमंत झाम याला दोन आठवड्यांपूर्वी नाट्यमयरीत्या अटक केली होती. त्यानंतर त्याचा साथीदार यौवन गंभीरही पोलिसांच्या हाती लागला. सध्या हे दोघे न्यायालयीन कस्टडीत आहेत. दरम्यान, या दोघांच्या चौकशीतून हेमंत झामचा काका आरोपी मुकेश झाम पुण्यात हिंजेवाडी भागात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, गुन्हेशाखेच्या आर्थिक विभागाच्या पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांनी आपले पथक पुण्यात पाठविले. तेथे पोलिसांनी बरीच शोधाशोध केल्यानंतर बुधवारी सकाळी मुकेश झाम पोलिसांच्या हाती लागला. तो आणि त्याच्या पत्नीला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या सदनिकेची तपासणी केली असता कोट्यवधींची रोकडही पोलिसांना मिळाल्याचे समजते. मात्र, रोकड सापडल्याच्या माहितीला दुजोरा मिळू शकला नाही.आरोपी झाम दाम्पत्याला ताब्यात घेतल्यानंतर पोलीस पथकाने तेथील न्यायालयात कायदेशीर प्रक्रिया पार पाडली. त्यानंतर सायंकाळी तेथून पोलीस पथक झाम दाम्पत्याला घेऊन नागपूरकडे निघाले. शुक्रवारी दुपारपर्यंत ते नागपुरात पोहचतील, असे सूत्रांनी सांगितले.शुक्रवारपासून पोलिसांची शोधाशोधयेथील गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागाचे (ईओडब्ल्यू) पथक गेल्या शुक्रवारपासून पुण्यात झामला शोधत होते. अखेर गुरुवारी सकाळी हिंजेवाडी परिसरात तो पोलिसांच्या हाती लागला. झाम याने नागपुरात गिळंकृत केलेली रक्कम पुण्यात कोट्यवधीची मालमत्ता जमविण्यासाठी गुंतविल्याचे समजते.

टॅग्स :fraudधोकेबाजीArrestअटक