नागपूर : लॉकडाऊनमध्ये बंद असलेल्या आस्थापना अनलॉक झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने उघडल्या आहेत. पण कोरोना अजूनही गेलेला नाही. अजूनही पॉझिटिव्ह रुग्ण निघतच आहे. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी मास्क घाला, हाताला सॅनिटाईज करा या सूचनांचे बोर्ड ठिकठिकाणी आढळतात. काही आस्थापनांमध्ये सुरक्षा रक्षाकडून तशा सूचना दिल्या जातात. आता या सूचना देण्यासाठी नागपुरातील अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या एका तरुणाने 'अवेअरनेस डिव्हाईस' तयार केले आहे. हे डिव्हाईस घरात अथवा कार्यालयात लावल्यास प्रवेश करण्यापूर्वी मास्क व्यवस्थित लावा, हात सॅनिटाईज करा असा अलर्ट देते. (Now the awareness device will say, "Wear a mask, sanitize your hands".)
नहुश कुळकर्णी असे या युवा अभियंत्याचे नाव आहे. नहुशने कोरोनापासून बचाव करण्यासाठी हे यंत्र बनविले आहे. कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यामुळे अनेकजण निष्काळजीपणे वागतात. अनेकांच्या तोंडावरील मास्क देखील उतरला आहे. हॅण्ड सॅनिटाईज करण्याकडे तर पुरते दुर्लक्ष झाले आहे. पण जिथे गर्दी होते, अशा ठिकाणी हे दुर्लक्ष योग्य नाही. मॉल, थिएटर, सरकारी कार्यालय, रुग्णालये, शाळा आदी ठिकाणी गर्दी वाढायला लागली आहे. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी प्रवेश करताना किमान कोरोना नियमांचा अलर्ट मिळाल्यास लोकं सावध होतील, या उद्देशाने नहुशने हे डिव्हाईस बनविले आहे. यात त्याने सेन्सर आणि ऑडिओ रिकॉर्डर वापरला आहे. नागपूर विद्यापीठाच्या इन्क्युबिंग सेंटरच्या गेटजवळ हे डिव्हाईस लावले आहे. कुणीही आतमध्ये प्रवेश करण्यापूर्वी दोन फूट अंतरावरूनच हे यंत्र मास्क वापरा, सॅनिटाईज करा असा अलर्ट देते.- पीडब्ल्यूडीच्या कार्यालयात लावले डिव्हाईसजानेवारी महिन्यात नहुशने हे उपकरण पीडब्ल्यूडीच्या कार्यालयात लावले. या उपकरणात त्याने काही ?डव्हान्स फिचर्स ही टाकले. या यंत्रणाद्वारे टेम्प्रेचर देखील स्कॅन करता येत होते. ज्या कर्मचाऱ्याचे टेम्प्रेचर कमी असेल त्या कर्मचाऱ्याला कार्यालयात प्रवेश मिळत होता. प्रायोगिक तत्वावर नहुशने हा प्रयोग राबविला. त्याचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला.- वाहतूक पोलिसांसोबतही केले प्रयोगनहुशने २०१८ मध्ये व्हेरायटी चौकात नागपूर पोलिसांसोबत पायी चालणाऱ्यासाठी आगळावेगळा प्रयोग केला होता. ३५ सेकंदासाठी चौकातील सर्व सिग्नल रेड व्हायचे. त्या ३५ सेकंदात पायी चालणारे रस्ता क्रॉस करायचे. लॉ कॉलेज चौकात स्टॉप लाईन वाहन चालकाने क्रॉस केल्यास अनाऊन्समेंट व्हायची.- कोरोनात सावधगिरी बाळगण्यासाठी हे डिव्हाईस तयार केले आहे. कोरोना संपल्यानंतर या डिव्हाईसचा स्वागत करण्यासाठी देखील उपयोग होऊ शकतो. इन्क्युबिंग सेंटरचे सीईओ प्रताप शुक्ला यांच्या मार्गदर्शनात या डिव्हाईसच्या पेटेंटसाठी प्रयत्न सुरू आहे. सरकारी कार्यालयात दारू पिऊन येणाऱ्यावर निर्बंध लावण्यासाठी डिव्हाईस तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे.नहुश कुलकर्णी, अभियांत्रिकीचा विद्यार्थी