शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
3
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
4
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
8
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
9
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
10
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
11
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
12
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
13
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
14
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
15
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
16
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
17
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
18
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
19
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
20
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!

आता पोस्टाची कार्डलेस एटीएम सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2019 11:35 AM

आता एटीएमकार्ड शिवायही पैसे काढता येणार आहे. ही सोय डाक विभागाने ग्राहकांना करून दिली आहे.

ठळक मुद्दे२ सप्टेंबरपासून शहरातील ६५ पोस्ट ऑफिसमध्ये सुरूआधार नंबर सांगा करा विड्रॉवल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आता एटीएमकार्ड शिवायही पैसे काढता येणार आहे. ही सोय डाक विभागाने ग्राहकांना करून दिली आहे. विशेष म्हणजे पैसे काढताना कुठल्याही एटीएम कार्डची गरज नाही. फक्त आधार नंबर सांगितल्यावर तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी पोस्टाच्या कार्यालयात सांगितल्यास १० हजार रुपयांपर्यंत रक्कम काढता येऊ शकते.बँकिंग क्षेत्रात डाक विभागाने क्रांतिकारी पाऊल टाकले आहे. त्याचाच एक भाग म्हणून डाक विभागाने आधार सक्षम भुगतान प्रणाली (एईपीएस) सेवा सुरू केली आहे. नागपूर शहरात ६५ पोस्ट ऑफिसमध्ये ही सेवा सुरू झाली असल्याची माहिती नागपूर क्षेत्राचे पोस्ट मास्टर जनरल रामचंद्र जायभाये यांनी पत्रपरिषदेत दिली.ते म्हणाले की, ही सेवा ग्रामीण जनतेसाठी अतिशय उपयुक्त आहे. तसेच शहरातही एटीएमचा दुरुपयोग होण्यापासून ही सेवा उपयुक्त ठरणार आहे. डाक विभागाने सुरू केलेल्या इंडिया पोस्ट पेमेंट बँक (आयपीपीबी) एक वर्ष पूर्ण झाले आहेत. देशभरातील १,३६,००० पोस्ट ऑफिसमध्ये ही सेवा सुरू असून एका वर्षाच्या कालावधीत पोस्टाने १ कोटीपेक्षा जास्त खाती उघडली आहे. यासाठी २ लाखाच्या जवळपास पोस्टमनला घरोघरी जाऊन बँकिंग सेवा प्रदान करण्यासाठी स्मार्ट फोन व बायोमेट्रिक उपकरण उपलब्ध करून दिले आहे. महाराष्ट्रात ८,४८,०२१ खाती उघडण्यात आली आहे तर नागपूर क्षेत्रात ८६०५७ खाती उघडली आहे. सर्वात जास्त खाती उघडण्यात गडचिरोली जिल्हा अग्रेसर ठरला आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान मातृत्व वंदन योजनेंतर्गत १ लाखावर खाती उघडलेली आहेत. यावेळी पत्रपरिषदेला वरिष्ठ शाखा प्रबंधक अभिजित जिभकाटे, संचालक पवनकुमार डालमिया, अधीक्षक टी.ए.व्ही शर्मा, सहा. संचालक शशीन राय उपस्थित होते.

विविध सुविधाशिष्यवृत्ती, मनरेगामध्ये खाते उघडण्यासाठी डाक विभागाकडून महाविद्यालय व गावांमध्ये शिबिर लावण्यात येत आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून चेकबुक, मोबाईल मनी ट्रान्सफर, स्वीप इन स्वीप आऊट, एनईएफटी, आरटीजीएस, आयएमपीएस, रिटेल बिल पेमेंट आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याचे जायभाये यांनी सांगितले.

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिस