शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

आता नागपुरात ‘कोल्ड फॉगिंग’ने डासांशी लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 7:50 PM

डासांशी लढा देण्यासाठी महानगरपालिकेच्या हिवताप व हत्तीरोग विभागाने पाच ‘कोल्ड फॉगिंग’ मशीन विकत घेतल्या आहेत. विशेष म्हणजे, ही डिझेल वापरून धूर सोडणारी मशीन नाही, पाण्यात औषधी टाकून फवारणी करणारी मशीन आहे. या मशीनचा वापर घरात आणि बाहेर दोन्ही ठिकाणी करता येतो. सध्या ज्या भागात डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत त्या भागांतील घरांमध्ये या मशीनद्वारे फवारणी केली जात आहे. या फवारणीमुळे पूर्ण वाढ झालेल्या डासांचा नायनाट होत असल्याने चांगला प्रभाव दिसून येत आहे.

ठळक मुद्देमनपाने घेतल्या पाच मशीन : धूर नाही औषधांची फवारणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डासांशी लढा देण्यासाठी महानगरपालिकेच्या हिवताप व हत्तीरोग विभागाने पाच ‘कोल्ड फॉगिंग’ मशीन विकत घेतल्या आहेत. विशेष म्हणजे, ही डिझेल वापरून धूर सोडणारी मशीन नाही, पाण्यात औषधी टाकून फवारणी करणारी मशीन आहे. या मशीनचा वापर घरात आणि बाहेर दोन्ही ठिकाणी करता येतो. सध्या ज्या भागात डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत त्या भागांतील घरांमध्ये या मशीनद्वारे फवारणी केली जात आहे. या फवारणीमुळे पूर्ण वाढ झालेल्या डासांचा नायनाट होत असल्याने चांगला प्रभाव दिसून येत आहे.उपराजधानीत पावसाचा जोर कमी होऊ लागल्याने डासांचा प्रादूर्भाव दिसून येऊ लागला आहे. जानेवारी ते आतापर्यंत डेंग्यूच्या १८ रुग्णांची नोंद झाली आहे. महानगरपालिकेच्या हिवताप व हत्तीरोग विभागाने डासांचा प्रादूर्भाव कमी करण्यासाठी उन्हाळ्यापासूनच घराघरांची झाडाझडती घेणे सुरू केले आहे. विभागाच्या चमूने जून महिन्यात २७ हजार २८८ घरांची तपासणी केली असून यात ४९५ घरांत डेंग्यूचे डास व अळ्या आढळून आल्या आहेत. या दूषित घर व परिसरांमध्ये कीटकनाशक फवारणी करण्याची मोहीमही हाती घेतली आहे. मनपाच्या हिवताप व हत्तीरोग विभागाकडे डासांचा प्रादूर्भाव कमी करण्यासाठी डिझेलचा वापर करून धूर सोडणाऱ्या पाच मोठ्या तर हाताने वापरणाºया दहा ‘थर्मल फॉगिंग’ मशीन आहेत. आता यात पाच ‘कोल्ड फॉगिंग’ मशीनची भर पडली आहे. प्रायोगिक स्तरावर या मशीनचा वापर होत असलातरी गेल्या चार महिन्यात याचा चांगला प्रभाव दिसून येत असल्याचे व राज्यात हा पहिलाच प्रयोग असल्याचे विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.असा होतो वापरथर्मल फॉगिंग मशीनच्या औषधाच्या टाकीची क्षमता १० लिटर आहे. हाताने वापरणारी ही मशीन पेट्रोलनी चालते. प्रति लिटर पाण्यात १२ ग्रॅम ‘सॉलफॅक्ट’ औषध टाकून फवारणी केली जाते. घरात व बाहेरही याची फवारणी करता येते. फवारणीचा ‘फोर्स’ खूप जास्त असल्याने उंच झाडांपर्यंत फवारणी करणेही सोपे होते. विशेष म्हणजे, फवारणीच्या काही मिनिटांमध्येच डासांसोबतच इतर कीटकांचा सडा पडलेला दिसून येतो.‘थर्मल फॉगिंग’मध्ये डिझेलमध्ये औषध टाकून त्याचा धूर परिसरात सोडला जातो. यामुळे प्रदूषणात तर वाढ होतेच शिवाय डिझेल असल्याने खर्च चार पटीने वाढतो. त्या तुलनेत ‘कोल्ड फॉगिंग’ मशीनमध्ये डिझेलच्या ऐवजी पाण्याचा वापर होतो. यामुळे खर्च कमी होतो. शिवाय धूर न सोडता औषधाची फवारणी होत असल्याने प्रदूषणही कमी होते. शिवाय, डबक्यात किंवा ड्रम, टाकीमधील पाण्यात डासांच्या अळ्या आढळून आल्या तर औषध बदलवून तिथेही फवारणी करता येते.‘कोल्ड फॉगिंग’ला ‘डब्ल्यूएचओ’ची मान्यताप्रायोगिक स्तरावर नागपुरात ‘कोल्ड फॉगिंग’ला सुरुवात करण्यात आली आहे. राज्यातील हा पहिलाच प्रयोग असावा. याचा चांगला प्रभाव दिसून येत आहे. ‘कोल्ड फॉगिंग’ला जागतिक आरोग्य संघटनेची (डब्ल्यूएचओ) मान्यता प्राप्त आहे. तूर्तास पाच मशीन विकत घेण्यात आल्या असून याचा प्रयोग ज्या भागात डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहे त्या भागात केला जात आहे.डॉ. जयश्री थोटेमुख्य अधिकारी, हिवताप व हत्तीपाय रोग विभाग

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाHealthआरोग्य