शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

आता घरोघरी दारांवर मुलींच्या नावाच्या पाट्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2020 8:45 PM

१ जानेवारी २०२० पासून जन्म झालेल्या मुलींच्या घरावर तिच्या नावाची पाटी लावून घराला तिची ओळख देण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.

ठळक मुद्देमुली आणि महिलांच्या सन्मानार्थ उपक्रम : महिला व बाल कल्याण विभागाचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी घराघरातून मुलींच्या बाबतीत सन्मानाची भावना निर्माण होणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील घराघरातून मुलींना हा सन्मान मिळवून देण्याचा प्रयत्न महिला व बाल कल्याण विभाग करीत आहे. १ जानेवारी २०२० पासून जन्म झालेल्या मुलींच्या घरावर तिच्या नावाची पाटी लावून घराला तिची ओळख देण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.मुलींचा जन्मदर व शिक्षणाचा स्तर वाढविण्यासाठी केंद्र सरकारने २० ते २६ जानेवारीदरम्यान ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ हा सप्ताह साजरा केला. या अंतर्गत मुली, महिलांच्या सन्मानार्थ विविध उपक्रम राबविण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून ग्रामीण भागात ज्या घरात १ जानेवारी २०२० नंतर जन्म झाला. त्यांच्या घरी बालविकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी जाऊन तिच्या नावाची पाटी लावली. मुलीच्या पालकांना मार्गदर्शन करून पाटी लावण्यामागची भूमिका पटवून सांगितली. जन्मलेल्या मुलींच्या नावाने पाटी लावल्याने त्या कुटुंबीयांनीही आनंद व्यक्त केला. समाजात विशेष करून ग्रामीण भागात घराला पुरुषांच्या नावाची पाटी लावून पुरुषांची ओळख देण्यात येते. मात्र या परंपरेला महिला व बाल कल्याण विभागाने फाटा देत मुली व महिलांना सन्मान देण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्हाभर हा उपक्रम राबविण्यात आला असून, याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.मुलींच्या नावाने लावले झाडया अभियानांतर्गत ग्रामीण भागामध्ये जन्म झालेल्या मुलींच्या नावाने तिच्या घरी अथवा परिसरात तिच्या नावाने एक वृक्षसुद्धा लावण्यात आले. त्याचबरोबर माता आणि मुलीचा ग्रामस्तरावर सत्कारसुद्धा करण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून मुलींच्या सन्मानाचा विचार होत आहे. शिक्षणाचा प्रचार आणि प्रसारामुळे मुलींना आता सन्मानाची वागणूकही मिळायला लागली आहे. त्यामुळे २०११ च्या जनगणनेच्या तुलनेत सध्या ९७१ मुलींचा जन्मदर झाला. हे उपक्रम त्याला कारणीभूत ठरत आहे.भागवत तांबे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बाल कल्याण विभाग,जि.प.

 

टॅग्स :women and child developmentमहिला आणि बालविकासnagpurनागपूर