नागपूर : ‘इग्नू्’तर्फे (इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी) नव्या शिक्षण धोरणानुसार अभ्यासक्रमांची रचना करण्यात आली असून, नवीन ऑनलाइन अभ्यासक्रम मराठीतदेखील उपस्थित होणार आहे. ‘इग्नू’चे प्रादेशिक केंद्राचे संचालक डॉ. पी. शिवस्वरूप यांनी ही माहिती दिली.
विद्यापीठाच्या वतीने २०२२ च्या सत्रात सुरू होणाऱ्या नव्या ऑनलाइन अभ्यासक्रमांची घोषणा करण्यात आली. नवीन अभ्यासक्रम अगोदर इंग्रजी भाषेतच उपलब्ध असतील; परंतु ते लवकरच मराठीतदेखील सुरू करण्यात येणार आहे. स्वयंप्रभा आणि ज्ञानदर्शन चॅनलच्या माध्यमातून इग्नूचे अभ्यासक्रम मराठीत उपलब्ध करून दिले जातील.
नव्या अभ्यासक्रमांमध्ये एम.एस्सी (फूड सेफ्टी ॲन्ड क्वाॅलिटी मॅनेजमेंट), एम.ए. (एनव्हार्यमेंटल ॲन्ड ऑक्युपेशनल हेल्थ), पी.जी. डिप्लोमा इन ॲग्रिबिझिनेस, डिप्लोमा इन हॉर्टिकल्चर, पी.जी. डिप्लोमा इन मायग्रेशन, बीए ऑनर्स (संस्कृत, उर्दू), सर्टिफिकेट इन व्हिज्युअल आर्ट्स ॲन्ड अप्लाईड आर्ट यांचा समावेश असेल, अशी माहिती डॉ. शिवस्वरूप यांनी दिली. नवीन अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया जानेवारी २०२२ पासून सुरू करण्यात आली आहे.