लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वंशवाद, जातीवाद आणि भ्रष्टाचारात अडकलेल्या राजकीय पक्षाला दूर सारण्याचा निर्णय जनतेने घेतला आहे. यासाठी वंचित बहुजन आघाडी ही तिसरा सक्षम पर्याय म्हणून पुढे आली असून, यापुढे महाराष्ट्रात वंचित आघाडीशिवाय सरकार बनविणे अशक्य राहील, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि पक्षाच्या पार्लमेंट्री बोर्डचे सदस्य अण्णाराव पाटील यांनी येथे पत्रपरिषदेत केला.वंचित बहुजन आघाडी येत्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. उमेदवारांच्या मुलाखतीची सुरुवात शनिवारी नागपुरातून करण्यात आली. रविभवन येथील कॉटेज क्रमांक १३ मध्ये नागपूरसह वर्धा, भंडारा व गोंदिया या चार जिल्ह्यातील उमेदवारांच्या मुलाखती यावेळी घेण्यात आल्या. मुलाखतींना उत्तम प्रतिसाद मिळाला. १११ जणांनी मुलाखती दिल्या. दरम्यान त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनवणे, महिला प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर, खुशाल मेश्राम, सागर डबरासे, नीतेश जंगले, शहराध्यक्ष रवी शेंडे उपस्थित होते.काँग्रेससोबत आघाडी होईल की नाही, याबाबत विचारले असता अण्णाराव पाटील यांनी सांगितले की, आघाडीचा निर्णय पक्षनेतृत्व घेतील. परंतु उद्या आघाडी झाली नाही तर ऐन वेळेवर धावपळ होऊ नये म्हणून आम्ही राज्यातील सर्व २८८ जागा लढविण्याची तयारी ठेवली आहे. लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीला चांगले मतदान झाले. त्या आधारावर विधानसभेच्या कमीतकमी ८२ जागा निवडून येतील, असा दावाही त्यांनी केला. राज्यातील उमेदवारांच्या मुलाखतीला नागपुरातून सुरुवात होत आहे. चांगला प्रतिसाद आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभेतही विविध वंचित बहुजन समाजाला प्रतिनिधित्व दिले जाईल. परंतु उमेदवारी देताना चारित्र्यसंपन्न, सुशिक्षित, समाजाशी नाळ जुळलेला आणि प्रामाणिक राहील, यावर भर दिला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.लक्ष्मण माने यांच्याबाबत विचारले असता त्यांचा बोलविता धनी वेगळा असल्याचे सांगत यापुढे पक्षात असा प्रकार होणार नाही याची काळजी घेतली जाईल, असे स्पष्ट केले.
आता वंचितशिवाय सरकार बनणे अशक्य : अण्णाराव पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 10:20 PM
वंशवाद, जातीवाद आणि भ्रष्टाचारात अडकलेल्या राजकीय पक्षाला दूर सारण्याचा निर्णय जनतेने घेतला आहे. यासाठी वंचित बहुजन आघाडी ही तिसरा सक्षम पर्याय म्हणून पुढे आली असून, यापुढे महाराष्ट्रात वंचित आघाडीशिवाय सरकार बनविणे अशक्य राहील, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि पक्षाच्या पार्लमेंट्री बोर्डचे सदस्य अण्णाराव पाटील यांनी येथे पत्रपरिषदेत केला.
ठळक मुद्देउमेदवारांच्या मुलाखतीला सुरुवात