शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
6
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
7
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
8
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
9
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
10
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
12
ISRO-SpaceX ची भागीदारी यशस्वी, Elon Musk यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट; आता प्लेनपासून गावापर्यंत मिळेल नेट!
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
14
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
15
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
16
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
17
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन
18
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
19
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
20
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा

आता गुळलीतूनही हाेऊ शकेल काेराेना टेस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 12:23 AM

possible to take Corona test from gorgle घशावाटे किंवा नाकावाटे स्वॅब घेऊन काेराेना आजाराची चाचणी करणे बहुतेकांसाठी मनस्ताप देणारे ठरते. मात्र यापुढे हा त्रास सहन करावा लागणार नाही. साध्या गुळलीच्या माध्यमातून काेराेनाचे निदान करणे आता शक्य झाले आहे. नागपूरच्या राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशाेधन संस्था (निरी)ने काेराेना टेस्टिंगसंदर्भात एक माेठे संशाेधन केले आहे. या पद्धतीला ‘सलाईन गारगल आरटी-पीसीआर टेस्ट’ असे नाव देण्यात आले आहे.

ठळक मुद्देनीरीच्या वैज्ञानिकांचे महत्त्वपूर्ण संशाेधन : आयसीएमआरने दिली मान्यता, नागपुरातून सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : घशावाटे किंवा नाकावाटे स्वॅब घेऊन काेराेना आजाराची चाचणी करणे बहुतेकांसाठी मनस्ताप देणारे ठरते. मात्र यापुढे हा त्रास सहन करावा लागणार नाही. साध्या गुळलीच्या माध्यमातून काेराेनाचे निदान करणे आता शक्य झाले आहे. नागपूरच्या राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशाेधन संस्था (निरी)ने काेराेना टेस्टिंगसंदर्भात एक माेठे संशाेधन केले आहे. या पद्धतीला ‘सलाईन गारगल आरटी-पीसीआर टेस्ट’ असे नाव देण्यात आले आहे. उल्लेखनीय म्हणजे आयसीएमआरने या संशाेधनाला मान्यता दिली. नागपुरातूनच या टेस्टिंग पद्धतीला सुरुवात हाेणार असून पुढे देशभर त्याचा वापर केला जाईल.

नाकावाटे स्वॅब घेताना हाेणाऱ्या झिनझिन्या त्रासदायक असतात. अनेकांना नाकावाटे व घशावाटे नमुने देताना इजा झाल्याच्या घटना पुढे आल्या होत्या. अनेकांना नमुने देताना हायपर टेन्शनचा त्रास होत असल्याचेही समाेर आले. सध्या आरटीपीसीआर चाचणीसाठी नाकावाटे किंवा घशातून स्वॅब घेऊन रासायनिक द्रव्य असलेल्या ट्यूबमध्ये टाकला जाताे. प्रयाेगशाळेत पाठविल्यानंतर वेगवेगळ्या प्रक्रिया हाेतात. स्वॅबमधील विविध कणांमधून आरएनए वेगळा केला जाताे. ताे आरएनए कशाचा आहे, यावरून काेराेना झाला आहे की नाही, हे लक्षात येते. त्यासाठी सुसज्ज प्रयाेगशाळा आणि प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज असते. त्यानंतरही चाचणी पूर्ण व्हायला चार तास लागतात. आता हा त्रास कमी होणार आहे. नीरीच्या व्हायरॉलाॅजी विभागाचे डाॅ. कृष्णा खैरनार यांनी हे नवे तंत्र विकसित केले आहे. काेराेना टेस्टिंगसंदर्भात हे संशाेधन उपयुक्त मानले जात आहे. या टेस्टिंग प्रक्रियेत आरएनए एक्स्ट्रॅक्शनची गरज संपणार असून कमी वेळात काेराेना अहवाल प्राप्त हाेणे शक्य हाेणार असल्याचा दावा डाॅ. खैरनार यांनी व्यक्त केला. आयसीएमआरच्या मान्यतेमुळे नागपुरात ही प्रक्रिया सुरू हाेणार असून शहरातील प्रयाेगशाळांना याबाबत माहिती व मदत करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यामध्ये आराेग्य कर्मचाऱ्यांची गरज पडणार नाही. केवळ संबंधित व्यक्तीने सलाईन वाॅटरच्या १५ मिनिटे गुळण्या करून ते नमुने प्रयाेगशाळेत देता येईल. पाण्याची घनता हवेपेक्षा ८०० पट अधिक असते. सलाईनच्या पाण्याच्या गुळण्यामुळे विषाणू त्यामध्ये येईल व त्याला सहन ट्रेस करता येईल.

असे हाेतील फायदे

- नाकावाटे व घशावाटे स्वॅब घेताना हाेणारा त्रास कमी हाेईल.

- प्रशिक्षित आराेग्य कर्मचाऱ्यांची गरज पडणार नाही.

- सलाईन वाॅटरने घरी गुळण्या करून ते सॅम्पल प्रयाेगशाळेत देता येईल.

- तपासणीसाठी लांब रांगेत उभे राहण्याची गरज राहणार नाही. त्यामुळे गर्दीही टाळता येणार आहे.

- काेराेनाचा अहवाल कमी वेळात प्राप्त करणे शक्य हाेईल.

- नमुने गाेळा करताना हाेणारा वैद्यकीय कचरा कमी हाेईल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर