शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
4
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
5
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
6
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
7
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
9
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
10
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
11
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
13
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
14
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
15
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
16
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
17
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
18
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
19
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
20
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष

देशातील नक्षल्यांसाठी आता संयुक्त अ‍ॅक्शन प्लॅन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 10:13 AM

स्वातंत्र्यानंतर फोफावत आणि चिघळत चाललेल्या नक्षलवादाचा नायनाट करण्यासाठी विविध राज्यातील पोलीस आणि वेगवेगळ्या सुरक्षा यंत्रणांनी आता हातात हात घालून काम करण्याचा संकल्प केला आहे.

ठळक मुद्देसुरक्षा यंत्रणांचा संकल्पनागपुरात ठरली व्यूहरचना

नरेश डोंगरे ।आॅनलाईन लोकमतनागपूर : कानून के हात बहोत लंबे होते है... ही म्हण सर्वपरिचित आहे. यापुढे आता कानून के हात लंबे आणि खूप सारे असणार आहे. होय, स्वातंत्र्यानंतर फोफावत आणि चिघळत चाललेल्या नक्षलवादाचा नायनाट करण्यासाठी विविध राज्यातील पोलीस आणि वेगवेगळ्या सुरक्षा यंत्रणांनी आता हातात हात घालून काम करण्याचा संकल्प केला आहे. या एकत्रित हाताच्या बळकटीतून नक्षल चळवळीची मानगूट आवळण्याची व्यूहरचना शुक्रवारी नागपुरात आयोजित विविध राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत करण्यात आली.भारतातील अनेक राज्याच्या सुरक्षा यंत्रणांपुढे नक्षलवाद डोकेदुखीचाच विषय आहे. राज्याच्या राजधानीच्या टोकावर असलेल्या गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती १९८२ ला झाली. निसर्गाने वनवैभवाची, खनिजाची गडचिरोली-गोंदियावर मुक्त उधळण केली आहे. मात्र, नक्षल्यांनी या जिल्ह्याच्या विकासाला अशी काही उधळी लावली की येथील जनजीवन प्रचंड दहशतीत आले. नक्षलवाद्यांनी वेगवेगळ्या हिंसक घटना घडवून ३५ वर्षांत पोलीस खबरे असल्याच्या संशयावरून ४७४ सामान्य नागरिकांच्या हत्या केल्या. वेळोवेळी घातपात घडवून १९१ पोलिसांचे जीव घेतले. कर्तव्यावर असलेल्या ५११ पोलिसांना जीवघेण्या जखमा दिल्या. पोलिसांसोबत विशेष पोलीस अधिकारी म्हणून काम करणाऱ्या २० जणांना क्रूरपणे मारले. तोडफोड, जाळपोळ करून नक्षलवाद्यांनी आतापर्यंत २९ कोटींच्या मालमत्तेचे नुकसान केले. हे केवळ एकट्या नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील भयावह चित्र आहे. असेच किंवा याहीपेक्षा भयावह चित्र छत्तीसगड, मध्य प्रदेश, झारखंड, ओरिसा, तेलंगणा, आंध्र प्रदेशमध्ये आहे. अबूझमाड, दंतेवाडा हे परिसर नक्षल्यांच्या गुहा मानल्या जातात. नक्षलवादाचा साप कधी अन् कुठे वळवळेल आणि कुणाचा बळी घेईल, याचा काहीच नेम नाही. केंद्र सरकार आणि नक्षलग्रस्त राज्य सरकार आपापल्या परीने तीन दशकांपासून नक्षलवादाविरोधात झुंजत आहे. मात्र, नक्षलवाद संपण्याऐवजी वाढतच आहे. अलीकडे नक्षलवादाचा नायनाट करण्यासाठी केंद्राने घेतलेल्या आक्रमक भूमिकेचा फायदा झाला आहे. त्यामुळे गडचिरोलीसह अनेक भागातील नक्षलवाद बॅकफूटवर आहे. त्याला तसाच मागे सारण्यासाठी विविध राज्यातील पोलिसांना सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), केंद्रीय राज्य राखीव दल (सीआरपीएफ), आयटीबीपीचेही पाठबळ मिळाले आहे. या सर्वांनी मिळून नक्षलवादाविरुद्ध एक नवी आक्रमक ‘आॅपरेशन’ची तयारी चालवली आहे.त्यासाठी येथील नक्षल विरोधी अभियानाच्या (एएनओ) सुराबर्डीतील केंद्रात शुक्रवारी विविध राज्यातील पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. पोलीस महासंचालक सतीश माथूर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, एएनओचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (एडीजी) डी. कनकरत्नम, बालाघाटचे एडीजी श्री जनार्धन त्याचप्रमाणे महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, मध्य प्रदेशमधील २८ वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि बीएसएफ, सीआरपीएफ, आयटीबीपीचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते. वरिष्ठांच्या आदेशावरून एएनओचे महानिरीक्षक शरद शेलार यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. एका राज्यात घातपात करून बाजूच्या राज्यात पळून जायचे. तेथे काही दिवस थांबल्यानंतर तेथील नक्षल्यांकडून घातपात करवून पुन्हा दुसऱ्या राज्यात पळून जायची नक्षली नेत्यांची क्लृप्ती यापुढे चालू द्यायची नाही, असा निर्धार या बैठकीत करण्यात आला.नेते अन रसद पुरविणाऱ्यांवर नजरविविध राज्यातील शिर्षस्थ नक्षली नेते, दलम कमांडर आणि त्यांच्यावरील गुन्ह्यांची, त्यांच्या कार्यपद्धतीची बारीकसारीक माहिती एक दुसऱ्यांना पुरवून नक्षल्यांचे कटकारस्थान उधळून लावण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला. नक्षल्यांना रसद पुरविणाऱ्यांवर कडक नजर ठेवतानाच नक्षली नेते, फ्रंटल आॅर्गनायझेशनवरही सूक्ष्म नजर ठेवून नक्षल चळवळीची मानगूट पकडण्याचा संकल्प या बैठकीत घेण्यात आला.सुरक्षा यंत्रणांच्या या बळकट एकत्रीकरणातून भविष्यात चांगले परिणाम बघायला मिळेल,असा विश्वास एका वरिष्ठ अधिकाऱ्याने लोकमतशी बोलताना व्यक्त केला आहे.

टॅग्स :Terrorismदहशतवाद