लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आता प्रवास जवळचा असो वा लांबचा, त्याच्या पद्धतीत बदल झाला आहे. शहरात मेट्रो रेल्वेने प्रवास करण्यासाठी आता मोठे बदल करण्यात आले आहेत. मास्क लावूनच स्टेशनवर प्रवेश मिळेल आणि सर्व प्रवासी नियमांचे पालन करताहेत वा नाही, हे पाहण्यासाठी मेट्रोसह स्टेशनवर कर्मचारी तैनात राहणार आहेत.सध्या देशाच्या अन्य शहरांमध्ये नागपूरच्या धर्तीवर मेट्रो चालविण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. पण अनलॉक-२ मध्ये मेट्रोचे संचालन होण्याचा अंदाज लावण्यात येत आहे. कोव्हिड-१९ लॉकडाऊनदरम्यान रेल्वे आणि अलीकडेच विमानांचे उड्डाण सुरू झाले आहे. यामध्येही प्रवासाची सुरुवात नियमांतर्गत झाली आहे. आता याच शृंखलेत संचालनापूर्वी नागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने तयारी केली आहे.असे असणार नियममास्क लावल्यानंतरच मिळणार स्टेशनवर प्रवेश.सीटांमध्ये अंतर राखण्यासाठी लावण्यात येणार स्टीकर.स्टेशन आणि मेट्रोमध्ये नियमांचे पालन करण्यासाठी तैनात राहणार कर्मचारी.सॅनिटायझरचा उपयोग करूनच मेट्रोमध्ये प्रवेश मिळणार.फ्रंटलाईन आणि तिकिटिंग स्टाफ मास्क व हॅन्डग्लोव्हजसह तैनात राहणार.प्रत्येक प्रवाशाच्या तापमानाची तपासणी होणार.स्टेशनवर फिजिकल डिस्टन्सिंगकरिता मार्किंग होणार.नियमांचे बोर्ड लावण्यात येणार.ई-तिकिटला प्रोत्साहनसुरक्षितता ध्यानात ठेवून ई-तिकिटला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. याशिवाय महाकार्डचा पर्याय उपलब्ध आहे. तिकिटासाठी पूर्णपणे डिजिटल पेमेंट व्हावे, असा आमचा प्रयत्न आहे. मेट्रोचे संचालन सरकारच्या आदेशानंतरच सुरू करण्यात येणार आहे.अखिलेश हळवे, जनसंपर्क अधिकारी, महामेट्रो.
आता नागपुरात मेट्रोमध्ये सावधतेने होणार प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2020 9:49 PM
आता प्रवास जवळचा असो वा लांबचा, त्याच्या पद्धतीत बदल झाला आहे. शहरात मेट्रो रेल्वेने प्रवास करण्यासाठी आता मोठे बदल करण्यात आले आहेत. मास्क लावूनच स्टेशनवर प्रवेश मिळेल आणि सर्व प्रवासी नियमांचे पालन करताहेत वा नाही, हे पाहण्यासाठी मेट्रोसह स्टेशनवर कर्मचारी तैनात राहणार आहेत.
ठळक मुद्देमास्क लावून होणार प्रवेश : नियमांचे पालन बंधनकारक