आॅनलाईन लोकमतनागपूर : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात होते. मात्र, यापुढे त्याऐवजी पावसाळी अधिवेशन नागपुरात होण्याचे संकेत शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या मुद्यावर काँग्रेस नेत्यांमध्ये मतभेद असल्याचे समोर आले आहे.संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी गुरुवारी सध्यातरी नागपूर अधिवेशन जुलैमध्ये घेण्याचा प्रस्ताव विचारधीन असल्याची माहिती गुरुवारी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली होती. हा धागा धरीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी विधानसभेत या मुद्यावर सरकारने भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नागपुरात हिवाळी ऐवजी पावसाळी अधिवेशन घ्यावे, असा कामकाज सल्लागार समितीमध्ये आपला प्रस्ताव आहे. बैठकीत त्यावर चर्चा होईल व त्यानंतर निर्णय घेतला जाईल. जुलैमध्ये मुंबईत मुसळधार पाऊस असतो. अनेक प्रश्न उद्भवतात. शिवाय अर्थसंकल्पीय अधिवेशनानंंतर होणारे अधिवेशन नागपुरात झाले तर त्याचा विदर्भाला फायदाच होईल, असेही त्यांनी सांगितले. स्वत: मुख्यमंत्र्यांचा प्रस्ताव असल्यामुळे आता गुलाबी थंडीत नागपुरात होणारे हिवाळी अधिवेशन इतिहासजमा होऊन पावसाळी अधिवेशनात सरकार नागपुरात दाखल होईल, हे निश्चित मानले जात आहे.दरम्यान, नागपुरात जुलैमध्ये अधिवेशन घेण्यावरून काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये मतभेद दिसून आले. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिवेशन जुलैमध्ये घेण्यास काहीही हरकत नसल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. पण होणारे अधिवेशन हे चार ते सहा आठवड्याचे व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तर त्याच व्यासपीठावर उपस्थित असलेले उपनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी अधिवेशन जुलैमध्ये घेण्यास विरोध केला. जुलैमध्ये शेतकऱ्यांचा हंगाम असतो. पीक निघाले नसते. त्यामुळे शेतमालाला मिळणारे भाव, पिकांचे होणारे नुकसान याचा कुठलाही अंदाज आलेला नसतो. शेतकऱ्यांचे प्रश्न या काळात समोर आलेले नसतात, असेही त्यांनी सांगितले.हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नापासून पळ काढण्याचा सरकारने मार्ग शोधला आहे. जुलैमध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न समोर येत नाही. त्यामुळे जुलैचे अधिवेशन नागपुरात घेऊन शेतकऱ्यांना कुठलाही न्याय मिळणार नाही. आ. विजय वडेट्टीवारउपनेते, काँग्रेस
आता नागपुरात हिवाळी नव्हे पावसाळी अधिवेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 12:10 AM
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपुरात होते. मात्र, यापुढे त्याऐवजी पावसाळी अधिवेशन नागपुरात होण्याचे संकेत शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या मुद्यावर काँग्रेस नेत्यांमध्ये मतभेद असल्याचे समोर आले आहे.
ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांचे संकेत : काँग्रेस नेत्यांमध्ये मतभेद