शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

आता नागपूरची मेट्रो रेल्वे ४१.५ किलो मीटर आणि  ४०स्थानके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 8:26 PM

पूर्वीच्या ३८.५ कि़मी. आणि ३६ स्टेशनच्या तुलनेत आता मेट्रो रेल्वे पहिल्या टप्प्यात ४१.५ कि़मी. धावणार असून त्या मार्गात ४० स्थानके राहणार असल्याची माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्देमहामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित यांची माहितीपहिल्या टप्प्यात ५० टक्के काम पूर्ण

आॅनलाईन लोकमतनागपूर : पूर्वीच्या ३८.५ कि़मी. आणि ३६ स्टेशनच्या तुलनेत आता मेट्रो रेल्वे पहिल्या टप्प्यात ४१.५ कि़मी. धावणार असून त्या मार्गात ४० स्थानके राहणार असल्याची माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली.मिहान डेपोपुढे इको पार्क आणि मेट्रो सिटीपर्यंत तीन कि़मी. अंतर वाढले आहे. कॉटन मार्केट, एअरपोर्ट साऊथ, इको पार्क आणि मेट्रो सिटी अशा चार स्टेशनचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. जमिनीवर धावणाऱ्या  मेट्रो रेल्वेची लांबी ८ कि़मी. झाली आहे. दुसऱ्या  टप्प्यात मेट्रो रेल्वेचा ५० कि़मी. विस्तार कापसी, कन्हान पूल, बुटीबोरी आणि हिंगणापर्यंत होणार आहे. नवीन मेट्रो पॉलिसीमुळे डिसेंबर अखेरपर्यंत डीपीआर तयार होईल. पहिल्या टप्प्यात मेट्रोचे डबे नागपुरात तयार होणार नाहीत, पण नवीन मेट्रो पॉलिसीमध्ये दुसऱ्या  टप्प्यात डबे नागपुरात तयार होऊ शकतात.आरडीएसओ चाचणी पूर्णजमिनीवरून धावणाऱ्या  मेट्रो रेल्वेची प्रवेश चाचणी रेल्वे बोर्डांतर्गत कार्य करणाऱ्या  आरडीएसओने पूर्ण केली असून आठवड्यात प्रमाणपत्र मिळण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर रेल्वे सुरक्षा आयुक्तांतर्फे सुरक्षेच्या तपासणीसाठी चमू प्रमाणपत्र मिळाल्यानंतर येणार आहे. ही सर्व प्रक्रिया डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर नवीन वर्षात अर्थात जानेवारी-२०१८ पासून मेट्रो रेल्वेची जॉय राईड सुरू होईल.आतापर्यंत २११५ कोटी खर्चआतापर्यंत मेट्रो रेल्वेच्या विकास कामांवर २११५ कोटींचा खर्च झाला आहे. त्यात १६०० कोटी रुपये विदेशी वित्तीय संस्था (जर्मनी व फ्रान्स)आणि ५१५ कोटी राज्य शासनाकडून मिळाले आहे. तसे पाहिल्यास एकूण खर्च २७०० कोटींचा असून त्यात जमिनीच्या किमतीचा समावेश आहे. मार्च-२०१८ पर्यंत ८०० कोटी महामेट्रोला मिळणार आहे.स्टेशनपासून सायकलचा उपयोगमल्टी मॉडेल इंटिग्रेशन आणि फिडर सेवेंतर्गत प्रवाशांना स्टेशनपासून ८०० मीटरचे अंतर सायकलने कापता येईल. सायकल खासगी कंपनी पुरविणार आहे. ही एक स्मार्ट डॉकलेस पब्लिक बाईक शेअरिंग योजना आहे. सायकलच्या उपयोगासाठी ५ ते १० रुपये खर्च येईल. हा प्रकल्प चिचभुवन आणि खापरी येथे प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येणार आहे. चीनमधील गाँगझाऊ शहरात सर्वत्र सायकलचा उपयोग करण्यात येत असल्याचे दीक्षित यांनी सांगितले.५० टक्के उत्पन्न व्यावसायिक स्वरूपातमेट्रो रेल्वेचे ५० टक्क्यांपेक्षा जास्त उत्पादन व्यावसायिक स्वरूपात राहणार असून त्यासाठी मनपा आणि नासुप्रकडून कंपनीला मोक्याचे भूखंड मिळाले आहेत. त्या ठिकाणी आधुनिक स्टेशन उभारून आणि व्यावसायिक उपक्रम राबवून व्यावसायिक उत्पन्न मिळेल. सिंगापूर मेट्रो रेल्वेला ४० टक्क्यांपेक्षा जास्त व्यावसायिक उत्पन्न मिळत नाही. याशिवाय कंपनीला मिळालेल्या जागेवर हिंगणा येथे २५ हेक्टर आणि मेट्रो सिटी येथील २५ हेक्टर जागेवर निवासी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. दोन्ही प्रकल्पाचे डिझाईन हफिज कॉन्ट्रॅक्टरने तयार केले आहे. या प्रकल्पात सर्वसामान्यांना खरेदीचा पर्याय राहील. व्यावसायिक उत्पन्नामुळे तिकिटांचे दर कमी राहतील आणि प्रवासी संख्येत वाढ होईल.सोलर पॅनल कंपनी लावणारमहामेट्रो सोलर पॅनलवर आधारित ओपन अ‍ॅसेस कॅप्टिव्ह प्रकल्प बीओटी तत्त्वावर उभारणार आहे. त्यात महामेट्रोचा १० टक्के वाटा राहील. पूर्वी महावितरणसोबत प्रकल्प उभारताना विजेचा प्रति युनिट ७.५० रुपये खर्च अपेक्षित होता. पण कंपनी स्वतंत्ररीत्या प्रकल्प उभारत असल्यामुळे कंपनीला वीज प्रति युनिट ४.५० रुपये मिळणार आहे.पत्रपरिषदेत कंपनीचे प्रकल्प संचालक महेशकुमार अग्रवाल, संचालक (रोलिंग स्टॉक) सुनील माथूर, वित्त संचालक एस. शिवमाथन आणि महाव्यवस्थापन (प्रशासन) अनिल कोकाटे उपस्थित होते.

टॅग्स :Metroमेट्रो