शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

आता कांदाही गाठणार शंभरी! सामान्यांना रडवणार; नवीन कांदा नोव्हेंबरअखेरीस येणार

By मोरेश्वर मानापुरे | Updated: October 28, 2023 21:55 IST

Nagpur: टोमॅटोपाठोपाठ आता कांद्याच्या दरातही विक्रमी वाढ होत असल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे. सध्या नागपुरातील कळमना ठोक आलू-कांदे बाजारात दर्जानुसार ५० ते ६० रुपये आणि किरकोळमध्ये ८० रुपये किलो भाव आहे.

- मोरेश्वर मानापुरे 

नागपूर-  टोमॅटोपाठोपाठ आता कांद्याच्या दरातही विक्रमी वाढ होत असल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे. सध्या नागपुरातील कळमना ठोक आलू-कांदे बाजारात दर्जानुसार ५० ते ६० रुपये आणि किरकोळमध्ये ८० रुपये किलो भाव आहे. केवळ आठवड्यातच २० रुपये किलोची वाढ झाली आहे. टोमॅटोनंतर आता कांद्याची शंभरीकडे वाटचाल सुरू आहे. 

नोव्हेंबरअखेरीस वा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात नवीन कांदे बाजारात आल्यानंतरच भाव कमी होण्याची शक्यता ठोक व्यापारी गौरव हरडे यांनी व्यक्त केली. वाढीव दरामुळे टोमॅटोप्रमाणेच लोक कांद्याची चव विसरायला लागतील, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. वाढीव दरामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर ताण येणार आहे. मागणीच्या तुलनेत कमी पुरवठा, हे मुख्य कारण समजले जात आहे.

दक्षिण भारतातून कांद्याची आवकसध्या कळमना बाजारात दक्षिण भारतातून म्हणजे बेंगळुरू (कर्नाटक) आणि आंध्रप्रदेश राज्यातून कांद्याची आवक सुरू आहे. पूर्वी दररोज होणारी २५ ट्रकची आवक आता १० ट्रकपर्यंत (एक ट्रक १८ टन) कमी झाली आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने काहीच दिवसात भाव वाढले आहेत. ठोक बाजारात लाल कांदे दर्जानुसार ५० ते ६० रुपये आहेत. पुढे भाव स्थिर राहतील वा वाढतील, यावर आता भाष्य करणे कठीण आहे. भावपातळी केवळ पुरवठ्यावर अवलंबून राहील. 

दक्षिण भारतातून संपूर्ण भारतात पुरवठासध्या कांदे दक्षिण भारतातून संपूर्ण भारतात विक्रीसाठी जात आहेत. त्यामुळेच सर्वच बाजारपेठांमध्ये कांद्याचा तुटवडा जाणवत आहे. हा तुटवडा आठवड्यापासून आहे. पुढे वाढण्याची शक्यता आहे. पांढरे कांदे केवळ बेळगांव येथे आहेत. जागेवरच ७० रुपये किलो भाव आहे. त्यामुळे पांढरे कांदे कळमन्यात विक्रीसाठी बोलविण्याची कुणीही हिंमत करीत नाही.

डिसेंबरच्या प्रारंभी येणार नवीन कांदेजळगाव, जामोद, धुळे, औरंगाबाद, चाळीसगाव, नाशिक, मराठवाडा येथील कांदे नोव्हेंबरअखेर वा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात विक्रीसाठी कळमन्यात उपलब्ध होतील. त्यावेळी कांद्याचा दर्जा कसा राहील, हे आता सांगणे कठीण असल्याचे व्यापाऱ्यांचे मत आहे. महाराष्ट्रातील नवीन कांदे बाजारात आल्यानंतरच भाव कमी होतील. ग्राहकांना एक ते सव्वा महिना जास्त दरातच खरेदी करावे लागतील. यंदा शेतकऱ्यांनी खरीप हंगामात कांदा पेरणीकडे पाठ फिरविली. त्यामुळे पिकावर परिणाम झाला आहे. त्यानंतरही कांद्याची टंचाई दिसणार नाही, असे व्यापारी म्हणाले.

जुन्या कांद्याचा साठा संपत आला आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने भाववाढ झाली आहे. महाराष्ट्रातील कांद्याचे पीक नोव्हेंबरअखेरीस वा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात कळमन्यात येईल. गुजरातेतील कांदा जानेवारीत महिन्यात विक्रीसाठी उपलब्ध होईल. आवक वाढल्यानंतरच भाव कमी होतील.-  गौरव हरडे(अध्यक्ष, कळमना आलू-कांदे अडतिया असोसिएशन)

टॅग्स :onionकांदाInflationमहागाईnagpurनागपूर